ऑपरेशन सिंदूर: भारताने लक्ष्य केलेली दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं कोणती?

पत्रकार परिषदेत महिला अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ऑपरेशन सिंदूर: भारताने लक्ष्य केलेली दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं कोणती?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी कॅम्प्सवर एअर स्ट्राइक केला. ऑपरेशन सिंदूर असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. या मोहिमेची सविस्तर माहिती विदेश मंत्रालय आणि लष्कराकडून देण्यात आली. विशेष म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाकडून स्क्वॉड्रन लीडर व्योमिका सिंग या महिला अधिकाऱ्यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली.

पाकिस्तानात ज्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आला. त्यासाठी टार्गेटची खूप विचारपूर्वक निवड करण्यात आली होती. या संदर्भातील काही व्हिडीओही दाखवण्यात आले. ६ ते ७ मे च्या मध्यरात्री १.०५ ते १.३० या वेळात ही ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले दहशतवादी तळ गुप्तचर माहितीच्या आधारे लक्ष्य करण्यात आले असून यात नागरी इमारती अथवा लष्कराला अजिबात लक्ष्य करण्यात आले नसल्याचे या दोन महिला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सीमारेषेपासून हल्ल्याचे ठिकाण किती लांब आहे याचीही माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या टार्गेट्सची निवड का करण्यात आली याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.

पीओकेमधील टार्गेट

पाकिस्तानच्या हद्दीतील टार्गेट

हे ही वाचा : 

‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताचे प्रत्युत्तर’

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?

“भारताने कोटली, मुझफ्फराबाद, बहावलपूरमध्ये हल्ला केला!” पाकने केलं मान्य

“दहशतवाद्यांनी कुंकू पुसलेल्या महिलांचा पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून केला आदर!”

Exit mobile version