धनत्रयोदशीच्या दिवशी असीमा या समाजोद्योगिक संस्थेद्वारा IMC – इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई येथे MSME आणि स्टार्टअप्ससाठी एक इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्यात आली होती. या समिट मध्ये ७० MSME आणि स्टार्टअप्स आपापल्या प्रोजेक्ट करिता गुंतवणुक संस्थांद्वारा फंड रेझिंग साठी सहभागी झाल्या होत्या. गुंतवणूक क्षेत्रातील काही नावाजलेल्या कंपन्या, या उद्योजकांचे प्रस्ताव आणि प्रकल्प ऐकण्यास तसेच समजून घेण्यासाठी आवर्जून हजर होत्या. स्पेस व्हेईकल, ग्रीन एनर्जी, AI, गेमिंग, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल, द्रोण, इन्फ्रास्ट्रकचर, मेटलर्जी असे अनेक सेक्टरमधील प्रकल्प व प्रस्ताव येथे मांडण्यात आले.

पॅनटोमॅथ कॅपिटल ॲडवायजर्स, सोमानी इंप्रेसा ग्रूप, JSW वेंचर्स, इंड ओरिएंट फायनॅन्शियल सर्विसेस, 247VC फंड, पगडी कॉर्पोरेट ग्रूप, कॅपरो फायनॅन्शियल सोल्युशनस श्री अवधूत वाघ ह्या संस्था उद्योजकांचे प्रस्ताव आणि प्रकल्प ऐकण्यास उपस्थित होत्या. मुंबईतील विविध Incubation सेंटर्स चे प्रमुख अधिकारी देखील या समिट मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमास भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश महामंत्री निरंजन प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स चे COO अतूल खराटे हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. जागतिक आर्थिक सद्य स्थिती आणि भारताच्या आर्थिक पॉलिसी मुळे आर्थिक महासत्ता होऊ घातलेली इकॉनॉमी या विषयावर त्यांनी चर्चा केली.
हेही वाचा..
सिडनीमध्ये रोहित- विराटची फटकेबाजी; भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय
अलीगढमध्ये पाच मंदिरांवर लिहिले “आय लव्ह मोहम्मद”
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या अकील खानला अटक
निवडणुकीपूर्वी मोतिहारीत शस्त्र साठा सापडला
सोमनी इंप्रेसाचे श्रीहर्षा बंड लुप्पी यांनी Corporate Venture Capital – The new frontier of raising capital हा विषय मांडला, द वेल्थ कंपनी (पॅनटोमॅथ ग्रूप) चे भव्य बगरिचा यांनी Investment opportunities via AIF हा विषय सादर केला तर इंडोरियंटचे आयवर मिस्किथ यांनी Fundraising via Equity या विषयावर चर्चा केली. इन्व्हेस्टर आणि उद्योजकांमध्ये २५० कोटी रुपयाच्या प्रकल्पासंदर्भात चर्चा आणि काही सामंजस्य करार झाले.
उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून इकॉनॉमीला चालना देण्याचे काम केल्याबद्दल असीमा या संस्थेचे फार कौतुक झाले. उपस्थित इन्क्युबेशन सेंटर च्या अनेक अधिकाऱ्यांनी असे उपक्रम त्यांच्या संस्थे मध्ये घेण्याचा आग्रह असीमाकडे केला आहे.







