31 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषडोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश

डोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश

राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा निर्णय

Google News Follow

Related

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीमध्ये महिन्याभरात दोन कंपन्यांना आग लागल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. यानंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन १३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, बुधवार, १२ जून रोजी लागलेल्या आगीनेही खळबळ उडाली होती. या वारंवार घडत असलेल्या आगींच्या घटनांमुळे आता  स्थानिक लोकांनी केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवली एमआयडीसी मधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून या सर्व कंपन्यांना कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोंबिवली एमआयडीसीमध्ये १८० केमिकल्स कंपन्या आहेत. त्यातील ४२ कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश दिले असून इतर कंपन्याही बंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट होऊन लागलेली आग आणि अमुद या रसायन कंपनीत स्फोट होऊन झालेली जीवितहानी लक्षात घेता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

रियासीतील हिंदू हत्याकांडाच्या निषेधार्थ अंधेरीत निदर्शने!

अल्लाह तआला देख लेगा… ‘न्यूज डंका’च्या बातमीसह ‘हा’ मेसेज व्हायरल

परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांचे निधन

मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!

डोंबिवलीत केलेल्या सर्वेक्षणानुसार, २५० ते २७५ धोकादायक आणि अतिधोकादायक कंपन्या असल्याचे केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले आहे. या धोकादायक कंपनीच्या यादीत इंडो अमाइन्स आणि मालदे कपॅसिटरस् या कंपन्यांचा समावेश आहे. रेसिडेन्शिअल आणि इंडस्ट्रियल मिक्स झाल्यामुळे हे स्फोट होत आहेत. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहर बसवण्यासाठी प्लॅन होणं गरजेचं आहे. धोकादायक, अति धोकादायक कंपन्यांना रेसिडेन्शिअल विभागातून स्थलांतर करायला पाहिजे या अनुषंगाने या समितीच्या तीन मीटिंग झाल्या आहेत. २० जून पर्यंत सर्वेक्षण समितीमार्फत जो रिपोर्ट सादर केला जाईल.  त्या अनुषंगाने हा कृती आराखडा बनवला जाईल आणि त्याची अंमलबजावणी करून धोकादायक इंडस्ट्रियलचे स्थलांतर करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा