31 C
Mumbai
Wednesday, April 8, 2026
घरविशेषमुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

'दुबई शॉपिंग फेस्टीव्हल'च्या धर्तीवर आयोजन

Google News Follow

Related

मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर २० ते २८ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फाऊंडेशनमध्ये शासकीय आणि अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. फाऊंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील आणि पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.

कसे असेल स्वरूप?

राज्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, विविध खाद्य संस्कृती, सायकलिंग टूर, हार्बर टूरिझम, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टिव्हीटीज आदी साहसी क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून शॉपिंग मॉल, कला दालने, चित्रपटगृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाइडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक, नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक आणि स्टेक होल्डर्स यांचा समावेश असलेल्या परिचय सहल (FAM Tour), चित्रपट, फॅशन शो इ. उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल, मुंबईतील पर्यटन वृद्धीस चालना मिळून राज्याच्या महसुलात देखील वाढ होईल, असे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा