33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषपद्मभूषण, पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड

पद्मभूषण, पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड

वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. भैरप्पा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांनी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बंगळुरू येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. भैरप्पा यांना बेंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भैरप्पा यांना दुपारी २:३८ वाजता हृदयविकाराचा झटका आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने, आपण एक उत्तम व्यक्तिमत्व गमावले आहे. ते एक निर्भय विचारवंत होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी लेखनाने कन्नड साहित्य समृद्ध केले आहे. आपल्या इतिहास आणि संस्कृतीबद्दलची त्यांची आवड येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”

संथेशीवर लिंगन्नय्या भैरप्पा हे साहित्य विश्वात एस. एल. भैरप्पा म्हणून ओळखले जात होते. ते एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार आणि पटकथा लेखक होते. पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित एस. एल. भैरप्पा हे भारतीय साहित्यातील एक मोठे नाव होते. २० जुलै १९३१ रोजी कर्नाटकातील हसन येथे त्यांचा जन्म झाला.

हे ही वाचा : 

मोहेंजोदारोच्या ‘डान्सिंग गर्ल’ची प्रतिकृती राष्ट्रीय संग्रहालयातून चोरीला; प्राध्यापकावर गुन्हा दाखल

कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!

‘वैभव’शाली फलंदाजी, १० सामन्यांत ४१ षटकारांचा विक्रमी पाऊस

वैद्यकीय शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

भैरप्पा यांची पहिली कादंबरी, भीमकाया ही १९५८ मध्ये प्रकाशित झाली होती. तेव्हापासून भैरप्पा यांनी जवळपास २५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ एनसीईआरटी (दिल्ली) येथे तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. एस. एल. भैरप्पा यांना २०१५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०२३ मध्ये, केंद्र सरकारने भैरप्पा यांना साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. भैरप्पा २५ वर्षांहून अधिक काळ कन्नड भाषेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या लेखकांपैकी एक होते. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा