भारतीय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकारने १ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी कुख्यात दहशतवादी अझहर मसूद असल्याचे दिसून येते. भारताने अझहर मसूदच्या दहशतवादी संघटनेच्या जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयावर हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यांमध्ये जैशच्या मुख्यालयाचे मोठे नुकसान झाले. तसेच भारताच्या कारवाईत अझहर मसूदच्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. यासह त्यांच्या जवळच्या चार जणांचाही मृत्यू झाला. आता सरकारने जाहीर मदतीनुसार, या सर्व लोकांच्या बदल्यात अझहर मसूद आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या खात्यात १४ कोटी रुपये जातील.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने एक रुपयांच्या मदतीबाबत माहिती दिली. मदतीच्या नावाखाली जाहीर झालेल्या या रकमेचा थेट फायदा आता फक्त मसूद अझहरलाच मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने मुरीदके येथील हाफिज सईदच्या लपण्याच्या ठिकाणांवर आणि नंतर बहावलपूरमधील जैशच्या लपण्याच्या ठिकाणांवर मोठे हल्ले केले होते. लाहोरपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूरवर भारताने केलेल्या या भयंकर हल्ल्याने दहशतवादी सूत्रधारांनाही हादरवून टाकले.
हे ही वाचा :
पाकिस्तान समर्थनात पोस्ट करणाऱ्याला देशभक्तीचा धडा
मराठमोळ्या सरन्यायाधीशांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
उपराष्ट्रपतींचा १५ मे रोजी राजस्थान दौरा
भारताने केलेल्या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. मसूद अझहरने स्वतः जारी केलेल्या निवेदनात, या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाल्याची कबुली देण्यात आली. या हल्ल्यांमध्ये त्याची पत्नी, मोठी बहीण आणि मेहुणा मारला गेल्याचे त्याने कबूल केले. याशिवाय, एक पुतण्या, भाची आणि इतर ५ मुलांची हत्या झाल्याची कबुली दिली.
आता या लोकांच्या मृत्यूनंतर, मसूद अझहर त्यांचा कायदेशीर वारस आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान सरकारकडून मिळणारी सर्व मदत त्याच्या खात्यात जाऊ शकते. याशिवाय, त्याला इतर ४ जवळच्या सहकाऱ्यांच्या नावे जारी केलेली मदत मिळण्याची शक्यता आहे.







