पाकचा बब्बर हा हिंदुस्थानचा गब्बर!

राफेलच्या नुकसानीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपाची टीका 

पाकचा बब्बर हा हिंदुस्थानचा गब्बर!

राफेल लढाऊ विमानांवरील वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यावर भाजप नेते संबित पात्रा यांनी टीका केली. पाकिस्तानच्या कथेची पोपटपंची आणि भारतीय सशस्त्र दलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा त्यांनी आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेस फक्त देशासोबत उभे राहण्याचा दावा करते, परंतु त्यांचे नेते सतत लष्करावर हल्ला करतात. ”सबूत गँग” (पुरावे टोळी) पुन्हा एकदा सक्रिय झाली असल्याचे त्यांनी म्हटले.

ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्या दिवसापासूनच राहुल गांधी, जयराम रमेश इत्यादी काँग्रेस नेत्यांनी भारतीय सैन्यावर आणि भारताच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ”सबूत गँग” भारताच्या कारवाईवर खूश नाही. राहुल गांधी, जयराम रमेश, रेवंत रेड्डी विचारत आहेत की किती राफेल विमाने पाडली गेली. पाकिस्तानचा हा बब्बर भारताचा गब्बर आहे, असे संबित पात्रा म्हणाले. ते पुढे म्हणाले, भारताच्या विजयामुळे आणि शौर्यामुळे गब्बरचा पराभव निश्चित आहे.

ते पुढे म्हणाले, पाकिस्तानी हवाई तळ किती नष्ट झाले किंवा किती दहशतवादी मारले गेले हे विचारण्याऐवजी, राहुल गांधींना फक्त किती भारतीय विमाने पाडण्यात आली हे जाणून घेण्यात रस आहे. सोनिया गांधींनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी रडल्या, राहुल गांधींनी २६/११ नंतर आनंद साजरा केला. आता, रेवंत रेड्डी, राहुल गांधी आणि जयराम रमेश किती भारतीय विमाने गमावली असा प्रश्न विचारत आहेत.”

पात्रा म्हणाले, भारताने ९ दहशतवादी तळ आणि ११ पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत आणि याचे फोटो देखील समोर आले आहेत. जर राफेल विमान कोसळले असते तर त्याचे अवशेष आणि पुरावे समोर आले असते. पण  काहीही समोर आले नाही.

हे ही वाचा : 

प्रभु श्रीराम यांची नीती नव्या भारताची नीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी मध्यप्रदेश दौऱ्यावर

भारताचं संरक्षण उत्पादन २०४७ मध्ये सहापट वाढून ८.८ लाख कोटी

प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला कडक आणि तत्पर उत्तर!

काँग्रेसच्या ‘जय हिंद यात्रे’वर निशाणा साधताना पात्रा म्हणाले, “ही ‘पाकिस्तान की हिंद यात्रा’सारखी वाटू लागली आहे. काँग्रेसमध्ये आता दोन गट आहेत, एक जो उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देतो आणि दुसरा जो भारतासोबत उभा राहू इच्छितो परंतु राहुल गांधींसारख्या नेत्यांनी त्यांना गप्प बसवले आहे. त्यांनी ही यात्रा थांबवावी आणि त्याऐवजी पाकिस्तानसोबत संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी.”

Exit mobile version