31 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरविशेषराहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांसह इंडी आघाडीच्या नेत्यांना अटक!

राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांसह इंडी आघाडीच्या नेत्यांना अटक!

विरोधकांकडून सरकारवर टीका 

Google News Follow

Related

नवी दिल्लीमध्ये SIR (Standard of Indian Representation) विरोधात आंदोलन करताना इंडी आघाडीच्या अनेक खासदार व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह अनेक इंडी आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे सर्वजण संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली आणि SIR विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, “घाबरले आहेत, सरकार भित्रं आहे.”

या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले,
“ते बोलू शकत नाहीत, कारण सत्य देशासमोर उघड आहे. ही लढाई राजकीय नाही, ही संविधान वाचवण्यासाठी आहे. ‘वन मॅन, वन व्होट’ ही संकल्पना जपण्यासाठी आहे. आम्हाला एक स्वच्छ, पारदर्शक मतदार यादी हवी आहे.”

इंडी आघाडीच्या मोर्च्याला रोखण्यात आले तेव्हा खासदार अखिलेश यादव बॅरिकेडवरून उडी मारताना दिसले. अटक केलेल्या खासदारांमध्ये कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड देखील होत्या. बस मधून नेत असताना खासदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा केल्या.

इंडी आघाडीच्या निषेध आंदोलनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले,  “राहुल गांधी जे बोलले ते खरं आहे, आणि माझंही मत तेच आहे. सरकार जर निवडणूक आयोगाकडे जाण्यासही तयार नसेल, तर मग सरकारला नक्की कसली भीती आहे, हे समजत नाही. हे एक शांततामय आंदोलन आहे, आणि त्यात VVIP लोक सहभागी आहेत… निवडणूक आयोगाने ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने हाताळू शकली असती. सर्व आघाडी पक्षांतून केवळ ३० खासदार निवडणे शक्य नाही.

हे ही वाचा : 

राहुल गांधी पाकिस्तानचा अजेंडा चालवतात

दिल्ली उच्च न्यायालयाने यासीन मलिकला बजावली नोटीस

पुढील २५ वर्षांची कार्ययोजना सभागृहासमोर मांडणार

बेटिंग अॅप्स प्रमोशन प्रकरण : राणा दग्गुबाती ईडीसमोर

फक्त ३० खासदारांसाठी परवानगी

दरम्यान, नवी दिल्लीचे उपपोलीस आयुक्त (DCP) देवेश कुमार म्हेला यांनी इंडी आघाडीच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “फक्त ३० खासदारांसाठी परवानगी देण्यात आली आहे. जेव्हा आमच्याकडे त्यांची नावं येतील, तेव्हा आम्ही त्या ३० खासदारांना निवडणूक आयोगाकडे घेऊन जाऊ.” ते पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगाकडून फक्त ३० खासदारांसाठीच परवानगी होती. मात्र, मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. आम्ही त्यांना आधीच सांगितलं आहे की केवळ ३० खासदारांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची परवानगी दिली जाईल.”

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी निषेध मोर्चादरम्यान पोलिस आणि सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. “पोलीस आणि सरकार आम्हाला ३० सेकंदांसाठीही मोर्चा काढू देत नाहीत. त्यांना आम्हाला इथेच थांबवायचं आहे. देशात ही कुठली लोकशाही आहे? खासदारांनाही निवडणूक आयोगाकडे जाण्याचं स्वातंत्र्य नाही. आता म्हणत आहेत की फक्त ३० लोकांना परवानगी आहे, तरी निदान त्या ३० लोकांना तरी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊ द्या…”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा