आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी २७ फेब्रुवारी रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित औपचारिक समारंभात स्वदेशी बनावटीची गाईडेड मिसाईल स्टेल्थ विनाशिका आयएनएस विशाखापट्टणमचे लोकार्पण केले आहे. प्रेसिडेंशियल फ्लीट रिव्यूमध्ये (पीएफआर) सहभागी होण्यासाठी हे जहाज प्रथमच विशाखापट्टणममधील बंदरावर आले आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी जहाजातून एक छोटी फेरी मारली आणि लोकार्पण कार्यक्रमानंतर तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ‘विशाखापट्टणम’ हे मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिका P15B श्रेणीतले प्रमुख जहाज आहे. हे जहाज २१ नोव्हेंबर २०२१ रोजी नौदलात दाखल झाले आहे. हे जहाज भारताच्या अद्ययावत जहाजबांधणी क्षमतेचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ बनण्याच्या दिशेने असलेले एक पाऊल आहे. ‘मेक इन इंडिया’ या अभिनव उपक्रमाचे हे जहाज उत्तम प्रतीक आहे.
या जहाजाचे बोधवाक्य संस्कृतमध्ये असून ‘यशो लाभस्व’ (‘वैभव प्राप्त करा’) असे आहे. या बोधवाक्याचे जहाजावरील कर्मचारी काटेकोर पालन करतात. हे ब्रीदवाक्य जहाजावरील खलाशी आणि कर्मचाऱ्यांना सर्व अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा देते. शिवाय जहाज आणि राष्ट्राचे वैभव जपण्यासाठी प्रेरित करते.
हे ही वाचा:
युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात
ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ
युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणमची वैशिष्ट्ये
- आयएनएस विशाखापट्टनम ही १६३ मीटर लांब आणि ७ हजार ४०० टन वजनाची आहे.
- ही युद्धनौका ३० नॉटिकिल मैल या गतीने प्रवास करु शकणार आहे.
- या युद्धनौकेवर ब्रम्होस- बराक सारखी विध्वसंक क्षेपणास्त्र तैनात आहेत.
- मध्यम आणि शॉट रेंज गन्स, एन्टी सबमरीन रॉकेट या सर्व यंत्रणा युद्धनौकेवर असणार आहेत.
- या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर२४९ ए स्टीलचा वापर करून केली आहे.
- भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे.







