26 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषवडिलधाऱ्यांच्या आयुष्यात समाधानाच्या क्षणासाठी तीर्थदर्शन योजना

वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात समाधानाच्या क्षणासाठी तीर्थदर्शन योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरूवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले.

हेही वाचा..

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संबोधले नाच-गाण्याचा कार्यक्रम!

कुलगाममध्ये दोन दहशतवादी टिपले, एके-४७सह दारूगोळा जप्त!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; जैश-ए-मोहम्मदच्या ६ सहकाऱ्यांना अटक!

पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नीमधील वाद विकोपाला !

मुख्यमंत्री शिंदे यावेळी शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणाले, तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ आई अंबाबाईच्या करवीर येथून होत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली रेल्वे अयोध्येसाठी रवाना होते आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य असे मंदिर साकारलेले आहे. प्रभू रामांचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी अयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी प्रणाम करून सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही अभिवादन केले.

ज्येष्ठांना राज्य व देशातील तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक समाधान मिळवणे सोपे होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा आपण प्रवास, निवास, भोजन खर्च करणार आहोत. भारतातील ७३ आणि आपल्या राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश केला आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आहे. तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे १०, वैद्यकीय मदतीसाठी तीन तर आयआरसीटीसीचे २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून अंमलबजावणी सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा