केंब्रिज विद्यापीठात दोनदा नापास होणाऱ्या राजीव गांधींची पंतप्रधान पदी निवड आश्चर्यकारक!

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे विधान

केंब्रिज विद्यापीठात दोनदा नापास होणाऱ्या राजीव गांधींची पंतप्रधान पदी निवड आश्चर्यकारक!

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते राजीव गांधी यांच्यावर भाष्य करताना त्यांनी केंब्रिजमधील त्यांच्या अपयशाची कहाणी सांगितली आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नाव वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आदर असलेले राजीव गांधी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना अय्यर यांनी मुलाखतीत खुलासा केला की, “जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा मला वाटले की एअरलाइन पायलट असलेला आणि दोनदा अपयशी ठरलेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो? मी त्याच्यासोबत केंब्रिजमध्ये शिकलो, जिथे ते नापास झाले. केंब्रिज विद्यापीठात नापास होणे खूप कठीण आहे कारण विद्यापीठ किमान प्रत्येकजण उत्तीर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करते. पण तरीही राजीव गांधी अयशस्वी झाले. यानंतर ते लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले आणि तिथेही तो नापास झाले. तेव्हा मला असे वाटले कि असा माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो?”.

हे ही वाचा : 

विराट हा सर्वोत्तम वनडे खेळाडू…मायकेल क्लार्कने केली स्तुती

सावरकर बदनामी प्रकरणी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना दंड!

संतोष देशमुख प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतरचं हत्येचे फोटो पाहिले

भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या या विधानानंतर, पुन्हा एकदा सोशल मीडियावर राजीव गांधी हे घराणेशाहीच्या राजकारणाचे सर्वात वाईट उदाहरण आणि सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळवण्यात अपयशी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकाने लिहिले की, “राजीव गांधी हे घराणेशाहीच्या राजकारणाचे सर्वात वाईट उदाहरण होते, एका अपयशी व्यक्तीला चांदीच्या ताटात सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळाली, जेव्हा कि त्यांनी वारंवार सिद्ध केले होते की ते त्यासाठी पूर्णपणे अयोग्य आहेत.

हा एक माणूस होता जो केंब्रिजमध्ये नापास झाला, इम्पीरियल कॉलेजमध्ये नापास झाला, आणि तरीही लाखो लोकांच्या देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम मानला जात असे. नेहरू-गांधी कुटुंबात जन्म घेणे हीच त्यांची एकमेव पात्रता होती, असे एकाने सोशल मिडीयावर म्हटले.

 

Exit mobile version