गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान क्रॅश झाले. या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. इंस्टाग्रामवरील स्टोरी सेक्शनमध्ये जान्हवीने लिहिले, “अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाच्या फ्लाइटच्या अपघाताची बातमी ऐकून मी हादरले आहे. अशा घटनांमधून निर्माण होणाऱ्या वेदना शब्दांत व्यक्त करणे खूप कठीण असते.”
तिने या पोस्टमध्ये प्रवाशांसोबतच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या. “मी प्रवाशांसाठी, क्रू मेंबर्ससाठी आणि पीडितांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करत आहे,” असेही तिने नमूद केले. एअर इंडियाने सोशल मीडियावर माहिती दिली: “AI171 फ्लाइट अहमदाबादहून लंडन गैटविककडे निघाली होती. ही फ्लाइट आज, १२ जून रोजी अपघातग्रस्त झाली आहे. सध्या आम्ही तपशीलांची चौकशी करत आहोत आणि ‘एक्स’ तसेच एअर इंडियाच्या वेबसाइटवर अधिक माहिती शेअर करू.”
हेही वाचा..
पायलटने ‘मे-डे’ कॉल केला होता !
भारतातील घडलेले १० भीषण विमान अपघात
बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांच्या घरावर हल्ला!
आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस
ही फ्लाइट टेक-ऑफनंतर काही क्षणांतच क्रॅश झाली. मेघाणी नगर परिसरात हे अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळावरून आकाशात काळा धुरळा उठताना पाहण्यात आला. विमानाचा प्रकार: हे एअर इंडियाचं बोईंग ७३७ प्रवासी विमान होतं. विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघाले होते.
अपघाताचे स्थान: हा अपघात अहमदाबाद हॉर्स कॅम्प परिसरात झाला. हा भाग सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळचा आहे. स्टेट पोलीस कंट्रोल रूमने अपघाताची पुष्टी केली असून, नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.







