राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. पंतप्रधान मोदी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखले आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘गुब्बारा’ हा शब्द वापरताय पण जनतेने निवडणुकीत १० वेळा तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ फोडला आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींवरील राहुल गांधींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळालं आहे. केंद्रातील मोदी सरकारने ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे.
हे ही वाचा :
होमगार्ड भरतीदरम्यान पडली बेशुद्ध, रुग्णवाहिकेतून नेताना झाला बलात्कार!
जगभरात पुन्हा वाजला पंतप्रधान मोदींचा डंका
‘श्रवणकुमार’ बनले रामपूरचे चार भाऊ …
पुण्यातल्या मशिदींवरील भोंगेही आता उतरवणार!
देशाच्या १४० कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिलंय. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान आहे. राहुल गांधी, तुमची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं, नैराश्याचं आणि अपयशाचं जिवंत उदाहरण आहे, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, आदरणीय मोदीजी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. मोदीजी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखले आहे. तुम्ही आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्यासाठी ‘गुब्बारा’ हा शब्द वापरताय पण जनतेने निवडणुकीत १०…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 26, 2025







