आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, लढायांचे आता डिजिटल दर्शन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, लढायांचे आता डिजिटल दर्शन

छत्तीसगडच्या २५व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिले डिजिटल आदिवासी संग्रहालय जनतेच्या सेवेत अर्पण केले. या संग्रहालयात आदिवासी समाजाचे जीवन, त्यांच्या वीर नायकांच्या गौरवकथा आणि समृद्ध लोकसंस्कृती यांचे दर्शन आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी संग्रहालय पाहिल्यानंतर त्याची प्रशंसा करताना सांगितले की, “या संग्रहालयामुळे आपण पाहू शकतो की आपल्या आदिवासी वीर नायकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी किती मोठे योगदान दिले.”

रायपूरमध्ये उभारलेले हे संग्रहालय “शहीद वीर नारायण सिंह स्मारक सह आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी संग्रहालय” या नावाने ओळखले जाते. या भव्य संग्रहालयात एकूण १६ गॅलऱ्या तयार करण्यात आल्या असून, प्रत्येक गॅलरीत विविध आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, त्यांच्या लढाया आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे.

इतिहासातील आदिवासी बंडांचे चित्रण

संग्रहालयात अनेक ऐतिहासिक आदिवासी विद्रोहांची माहितीही प्रदर्शित केली आहे —

हे ही वाचा : 

बनावट इतिहासातून शनिवारवाड्यावर अतिक्रमण

राष्ट्र उभारणीत गुंतलेल्या आरएसएसवर बंदी घालून काय साध्य होईल?

इंग्रजी, हिंदी मुलांची प्रतिभा कमकुवत करत आहेत

आधार कार्डसंदर्भातील नियम आजपासून बदलले

१६ गॅलऱ्या आणि ६५० मूर्ती — तंत्रज्ञानाने सज्ज संग्रहालय

संग्रहालयात एकूण १६ गॅलऱ्या असून त्यामध्ये सुमारे ६५० मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक मूर्तीबरोबर त्या वीर नायकांविषयीची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. संग्रहालयात मल्टिमीडिया, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामात वापरले गेलेले पारंपरिक अस्त्र-शस्त्र आणि वस्तू देखील येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगड शासनाचे कौतुक करत म्हटले की, “या संग्रहालयाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना आपल्या आदिवासी वीरांचा इतिहास समजेल आणि त्यांच्या शौर्याचा अभिमान वाटेल.”

Exit mobile version