29 C
Mumbai
Sunday, November 9, 2025
घरविशेषआधार कार्डसंदर्भातील नियम आजपासून बदलले

आधार कार्डसंदर्भातील नियम आजपासून बदलले

शुल्क रचनेतही सुधारणा

Google News Follow

Related

नव्या महिन्याच्या सुरुवातीस भारतीय नागरिकांच्या ओळखपत्राशी संबंधित सरकारी कागदपत्र ‘आधार कार्ड’ संदर्भातील काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. नव्या नियमांनुसार, आता आधार कार्डमध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आधारधारक आपली लोकसंख्याशास्त्रीय (Demographic) माहिती — जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक — ऑनलाइनच अद्ययावत करू शकतील.

याशिवाय, सर्व आधारधारकांना ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी पॅन कार्डला आधारशी लिंक करणे अनिवार्य असेल. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, फिंगरप्रिंट आणि छायाचित्र (Biometric) अपडेट करण्यासाठी १२५ शुल्क आकारले जाईल. मात्र, जर आधारधारकाचे वय ५ ते ७ वर्षे असेल आणि हे अपडेट पहिल्यांदाच केले जात असेल, तर ही सेवा मोफत राहील. तसेच, १५ ते १७ वर्षे वयोगटातील आधारधारकांना दोनदा अपडेट केल्यासही कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा..

पंतप्रधानांनी पंडवानी गायिका तीजनबाई यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून साधला संवाद

निरोप, पण शेवट नाही! म्हणत रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा

एशिया कप ट्रॉफीवर वाद! बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार

न्यूझीलंडचा इंग्लंडवर झंझावाती विजय! वनडे मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप

जर कार्डधारकाने नोंदणी क्रमांक, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल पत्ता यांसारखी माहिती दुरुस्त करायची असेल, तर ती बायोमेट्रिक अपडेटसोबत केल्यास निशुल्क असेल. पण जर फक्त डेमोग्राफिक माहिती स्वतंत्रपणे अपडेट केली, तर रुपये ७५ शुल्क आकारले जाईल. आधारधारक आपली ओळख आणि पत्ता प्रमाणित करणारी कागदपत्रे (जसे नाव, लिंग, जन्मतारीख इत्यादी) UIDAI पोर्टलवर शुल्कमुक्त सादर करू शकतात. मात्र ही सुविधा १४ जून २०२६ पर्यंत विनामूल्य उपलब्ध राहील. याशिवाय, आधार कार्ड रीप्रिंट (पुन्हा छपाई) करण्यासाठी आता ₹ ४० शुल्क द्यावे लागेल. घरी बसून एनरोलमेंट सेवा (Home Enrolment Service) हवी असल्यास, पहिल्या अर्जदारासाठी शुल्क ₹७०० आणि त्याच पत्त्यावर इतर व्यक्तींसाठी ₹३५० प्रति व्यक्ती असेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा