स्काय स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने ३-० ने मालिकेत क्लीन स्वीप केला आहे.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडचा डाव ४०.२ षटकांत फक्त २२२ धावांवर कोसळला. केवळ ७ धावांवर जेमी स्मिथ (५) बाद झाला, आणि ४४ धावांपर्यंत संघाने ५ बळी गमावले.
यानंतर जोस बटलर (३८) आणि सॅम करन (१७) यांनी सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मात्र, मोठी भागीदारी साधता आली नाही.
जेमी ओव्हर्टनने ६८ धावा (१० चौकार, २ षटकार) करत अर्धशतक झळकावले आणि इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याला ब्रायडन कार्सने ३६ धावा करून साथ दिली.
न्यूझीलंडकडून ब्लेअर टिकनरने ४ बळी, जेकब डफीने ३, आणि जकारी फॉल्क्सने २ बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडने ४४.४ षटकांत विजय मिळवला.
डेव्हन कॉन्वे (३४) आणि रचिन रवींद्र (४६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करत जोरदार सुरुवात दिली.
यानंतर डॅरिल मिचेलने ६८ चेंडूत ४४ धावा, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने २७ धावा केल्या.
इंग्लंडकडून जेमी ओव्हर्टन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी २ बळी, तर ब्रायडन कार्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.







