लोकसभेत मंगळवारी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर टीका केल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. भाजपने प्रियंका वड्रा यांच्या वक्तव्याला “चारित्र्यहनन” करणारे संबोधत ते संसदेच्या कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याची मागणी केली.
चर्चेदरम्यान प्रियंका वड्रा यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेची स्थिती, शिक्षण क्षेत्रातील कथित आरएसएसच्या वाढत्या प्रभावावर, विद्यार्थी आंदोलनांवर करण्यात आलेल्या पेलेट गनच्या वापरावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली.
शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर प्रियंका वड्रांचा सवाल
लोकसभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रल्हाद जोशी यांची शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करून चुकीचा संदेश दिला आहे. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांनी नवीन शिक्षणमंत्री (प्रल्हाद जोशी) म्हणून अशा व्यक्तीची नियुक्ती केली, ज्यांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेला पाठिंबा दर्शवला होता. या निर्णयातून देशातील कोट्यवधी मुलींना पंतप्रधानांनी कोणता संदेश दिला आहे? हा संदेश अगदी स्पष्ट आहे. त्यात कोणतीही संदिग्धता नाही.”
प्रियंका यांनी हे वक्तव्य बिल्किस बानो प्रकरणाचा संदर्भ देत केले.
हे ही वाचा:
‘विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठीमार, पेलेट गन चालवण्याची काय गरज होती?’
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
शेअर बाजारात दिवसभर चढ-उतार; सेन्सेक्स ७० अंकांनी घसरला
भाजपची माफीची मागणी
प्रियंका यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी तात्काळ आक्षेप घेतला. ते म्हणाले, “प्रियंका वाड्रा यांचे वक्तव्य हे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करणारे आहे. संसदेत अशा प्रकारची भाषा वापरण्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने संसदेच्या कामकाजाच्या नोंदीतून वगळली पाहिजेत.”
रिजिजू पुढे म्हणाले की, “त्या त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत, जरी त्या प्रथमच निवडून आल्या असल्या तरी. त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. जर त्या सभागृहाचे गांभीर्य राखू शकत नसतील, तर त्यांनी सभागृहाची माफी मागावी.”
या मुद्द्यावरून लोकसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्रल्हाद जोशींचीही कारवाईची मागणी
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही प्रियंका यांनी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्यावर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले की, “प्रियंका यांनी सभागृहाची माफी मागावी आणि त्यांचे वक्तव्य कामकाजाच्या नोंदीतून वगळावे.”
जोशी यांनी यावेळी प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांबाबतही भाष्य करत, त्या रोखण्यासाठी पूर्वी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती, असे म्हटले.
शिक्षण व्यवस्थेवर केंद्र सरकारवर टीका
प्रियंका यांनी केंद्र सरकारवर देशातील शिक्षण व्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप केला.







