छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस प्रशासनाकडून मोठी कारवाई करत विविध धार्मिक स्थळांवरील ६५९१ अनधिकृत भोंगे हटवण्यात आले आहेत. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या उद्देशाने करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी स्थानिक स्तरावरती धार्मिक स्थळांचे पदाधिकारी, धर्मगुरु यांच्या बैठका घेवून तसेच त्यांचे गैरसमज दूर करून भोंगे हटवले.
धार्मिक संघटनांना विश्वासात घेवून सर्व धर्मांच्या मदतीने शहरातील १९०६ धार्मिक स्थळांवरून ६५९१ भोंगे उतरवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या आणि कोणताही अधिकृत परवाना नसलेल्या भोंग्यांविरोधात ही मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान सर्व धर्मांच्या स्थळांवर समानतेने लक्ष देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता कायद्याचे पालन केले गेले आहे.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, भविष्यात अनधिकृत भोंगे लावल्यास कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
हे ही वाचा :
सचिनचा सुपुत्र अर्जुन होणार आता जावई
स्वातंत्र्य दिन २०२५: निमंत्रण पत्रिकांवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो आणि ‘चिनाब पुला’ची झलक!
युक्रेन युद्ध थांबवा, नाहीतर… पुतीन यांना कुणी दिली धमकी?
पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान अंदाधुंद गोळीबार, ३ जणांचा मृत्यू!







