प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल कारुळकर यांनी नुकतीच त्यांच्या लंडन भेटीदरम्यान इंडिया हाउसला भेट दिली. तसेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाच्या ‘ब्लू प्लेक’ला नमन करत स्मृतींना उजाळा दिला.

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारतींना ब्लू प्लेक पुरस्कार दिला जातो. गेल्या १५० वर्षांत, ऐतिहासिक महत्त्वाच्या ९०० हून अधिक इमारतींना ब्लू प्लेक देण्यात आला आहे. कोणत्याही इमारतीला हा पुरस्कार मिळणे ही ब्रिटनमध्ये अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्यांदाच हा सन्मान भारतीय वंशाच्या नूर इनायत खान यांना देण्यात आला. आतापर्यंत अनेक भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे.

लंडनमधील हायगेट येथील ६५, क्रॉमवेल अव्हेन्यू येथील इंडिया हाउस हे ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह होते. १९०५ मध्ये प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी याची स्थापना केली. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रवादाला महत्त्व प्राप्त होताच वर्मा यांनी जुलै १९०५ मध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. वसतिगृह असण्याव्यतिरिक्त, हे घर इंडियन होम रुल सोसायटी (IHRS) सह अनेक संस्थांचे मुख्यालय देखील बनले. तसेच पुढे हे वसतिगृह अनेक महत्त्वाच्या बैठकांचे केंद्र बनले. वीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, लाला हरदयाळ यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचा सततचा वावर येथे होता.
हे ही वाचा :
रायबरेलीत राहुल, अखिलेश आणि तेजस्वींचे ‘कलयुगचे ब्रह्मा-विष्णू-महेश’ म्हणून पोस्टर!
झारखंड येथून आयसिसचा संशयित दहशतवादी अटकेत!
नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत
ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
स्वातंत्र्य वीर सावरकर १९०६ मध्ये शिष्यवृत्तीवर लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये आले. १९०७ मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा पॅरिसला गेल्यानंतर, सावरकर आयएचआरएसचे नेते म्हणून उदयाला आले. १९०५ मध्ये भारतात अभिनव भारत सोसायटीची स्थापना केल्यानंतर, सावरकरांनी लंडनमध्ये असताना सोसायटीचे उपक्रम सुरू ठेवले. बॉम्ब मॅन्युअलच्या प्रती लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये देखील छापल्या गेल्या. सावरकरांनी इंडिया हाऊसमधून नियमित सार्वजनिक सभा आणि निदर्शने आयोजित केली. इंडिया हाऊस लवकरच ब्रिटनमधील भारतीय क्रांतिकारी चळवळीचे मुख्यालय बनले होते.







