27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषव्वा! आता सुरू करता येतील प्राथमिक शाळा

व्वा! आता सुरू करता येतील प्राथमिक शाळा

Google News Follow

Related

आयसीएमआरचा सल्ला

लहान मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे प्राथमिक शाळा सुरु कराव्यात असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हणजेच आयसीएमआरने व्यक्त केलं आहे. आता, राज्यात या आयसीएमआरच्या सल्ल्याकडे कसं पाहिलं जातं? शिक्षण विभाग, पालक आणि टास्क फोर्स सुद्धा याला अनुसरून प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत काय विचार करताय? हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे

केंद्रीय आरोग्य विभागाने नुकताच चौथा सेरो सर्वे केला. त्याचा निष्कर्ष नुकताच जाहीर करताना त्यामध्ये देशभरात लहान मुलांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक अँटिबॉडीज असून लहान मुलांना कोविड इन्फेक्शनचा धोका कमी असल्याच आयसीएमआर कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशात पुन्हा प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय सुरुवातीला घेणे योग्य राहील असं मत आयसीएमआरचे महसंचालक डॉ बलराम भार्गव यांनी मांडलं आहे.

शिवाय, प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक पालकांनी सुद्धा लसीकरण आणि शाळेच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘शाळा सुरू करण्याचा आणि त्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करायला गेलो तर शाळेत जात असताना विद्यार्थी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतात अगदी शिक्षक ते स्कुल बस ड्राइवर या सगळ्याचा प्राधान्याने लसीकरण व्हायला हवं. सोबतच, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना आणि बाहेरील देशातील परिस्थिती पाहता आणखी काही दिवस शाळा सुरू करण्याबाबत विचार करू नये’, अस मत मुंबईतील शाळेत शिकवणारे शिक्षक सचिन म्हात्रे यांनी मांडलं आहे. तर ‘मध्ये जेव्हा शाळा सुरू करण्याचा विचार राज्यात झाला तेव्हा आम्ही शाळेत पाठवायला तयार झालो, पण नंतर कोरोना पॉझिटीव्ह पेशंट वाढायला सुरवात झाली आणि शाळा बंद कराव्या लागल्या. आता जर शाळा सुरू करत असाल तर लसीकरण सर्वांचे पूर्ण व्हावे. शाळांनी सुरक्षितेची हमी द्यावी, अस मतं औरंगाबादच्या शाळेत आपल्या पाल्याला शिकवणाऱ्या पालक क्रांती बच्छाव यांनी मांडले.

हे ही वाचा:

इराकमध्ये आयएसआयएस डोकं वर काढतंय?

काय होता राज कुंद्राचा पॉर्न ‘प्लॅन बी’?

६७% भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोगागी तुंबाई

आयसीएमआरकडून पुन्हा एकदा सुरवातीला प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मत मांडून एकप्रकारे हिरवा कंदील जरी दिला असला तरी आपल्या राज्यात शिक्षण विभागला स्थानिक कोव्हीड परिस्थिती, लसीकरण व इतर सुरक्षिततेच्या बाबींचा काटेकोरपणे विचार करूनच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा लागेल. त्यानुसार नियोजन शिक्षण विभागाला करावे लागेल व सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा