सौदी अरेबियाचे राजघराण्यातील सदस्य प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद, ज्यांना जगभर “स्लीपिंग प्रिन्स” म्हणून ओळखले जात होते, यांचे निधन झाले आहे. ते जवळपास २० वर्षे कोमात होते. त्यांना २००५ मध्ये लंडनमध्ये एका कार अपघातात गंभीर दुखापत झाली होती.
प्रिन्स अल-वलीद यांचा जन्म एप्रिल १९९० मध्ये झाला होता. ते प्रिन्स खालिद बिन तलाल अल सौद यांचे ज्येष्ठ पुत्र आणि अरब श्रीमंत उद्योजक प्रिन्स अल वलीद बिन तलाल यांचे पुतणे होते. अपघाताच्या वेळी ते फक्त १५ वर्षांचे होते आणि लंडनमधील एका लष्करी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती.
हे ही वाचा:
गीता दत्त यांच्या गाण्यातून झळकत होते भावभावना
केस काळे आणि घनदाट बनवतो ‘भृंगराज’
त्यांच्यावर तत्काळ युनायटेड स्टेट्स आणि स्पेनमधील विशेष डॉक्टरांच्या मदतीने उपचार करण्यात आले, परंतु ते कधीही पूर्णपणे शुद्धीवर आले नाहीत. त्यानंतर त्यांना रियाधमधील किंग अब्दुलअझीज मेडिकल सिटी येथे हलवण्यात आले आणि तेथे जवळपास दोन दशके लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले.
प्रिन्स खालिद, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या लाईफ सपोर्ट हटवण्यास नेहमीच विरोध दर्शवला आणि दैवी चमत्काराची आशा कायम ठेवली.
स्लीपिंग प्रिन्सची ओळख
गेल्या अनेक वर्षांमध्ये, “स्लीपिंग प्रिन्स” म्हणून ओळखल्या गेलेल्या अल-वलीद यांच्या काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर दिसून आल्या होत्या, जिथे त्यांच्या बोटांनी थोडीशी हालचाल केली असल्याचे दिसून आले होते, ज्यामुळे त्यांच्या परिवाराला आणि चाहत्यांना आशेचा किरण मिळाला होता.
वडिलांचा शोकसंदेश
प्रिन्स खालिद यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करताना म्हटले, अल्लाहच्या निर्णयावर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि खूप दुःखाने आम्ही आमच्या लाडक्या पुत्राचा शोक करतो. अल-वलीद बिन खालिद बिन तलाल बिन अब्दुलअझीज अल सौद यांना अल्लाह माफ करो.”
शोकसंदेश
ग्लोबल इमाम्स कौन्सिल ने देखील सौदी राजघराण्याला शोकसंदेश दिला. त्यांनी म्हटले की, ग्लोबल इमाम्स कौन्सिल कडून प्रिन्स अल-वलीद यांच्याच्या निधनाबद्दल मोहम्मद बिन सलमान व संपूर्ण राजघराण्याला हार्दिक श्रद्धांजली व संवेदना.”
अंत्यविधी २० जुलै, रविवारी अस्रनंतर रियाधमधील इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशीद येथे होणार आहेत.







