पुणे: अवैध मस्जिद-मदरशावर फडणवीस सरकारचा बुलडोझर!

ग्रामस्थ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या तक्रारीची घेतली दखल 

पुणे: अवैध मस्जिद-मदरशावर फडणवीस सरकारचा बुलडोझर!

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तहसीलच्या चिंभळी गावात अवैध मस्जिद आणि मदरशावर फडणवीस सरकारचा बुलडोझर चालला आहे. ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणने (PMRDA) केली आहे. ग्रामस्थ, हिंदू संघटनांनी वारंवार आवाज उठवत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

चिंभळी ग्रामपंचायत क्षेत्रातील गट क्रमांक २०० आणि २०५ येथे शाकीर इस्माईल नावाच्या व्यक्तीने इस्लामिक धार्मिक स्थळ आणि रुग्णालयाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या मस्जिद, मदरसा, कब्रिस्तान आणि नमाज स्थळाचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केले होते. एवढेच नाहीतर येथे दर शुक्रवारी शेकडो लोकांना नमाजसाठी बोलावले जात होते.

हे ही वाचा : 

सैफवर हल्ला की अभिनय!

लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव! १०,००० एकर क्षेत्र जळून खाक

छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक!

‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या बांगलादेशी महिलेला मुंबईतून अटक

या अवैध बांधकामाविरोधात स्थानिक ग्रामस्थ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र निषेध नोंदवला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीएच्या आयुक्तांना याबाबत वारंवार तक्रारी देण्यात आल्या होत्या. यानंतर प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश दिले. पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांनी मिळून या अवैध बांधकामावर बुलडोझर चालवून मस्जिद आणि मदरसा जमीनदोस्त केला आहे.

Exit mobile version