छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. डी.के. रावसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणी विरोधी पथकाकडून याच तपास सुरु होता. त्यानंतर कारवाई करत पथकाने काल (२२ जानेवारी) रात्री सात जणांना अटक केली. यामध्ये डी.के राव हा या टोळीचा मोरक्या असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमधून दुसऱ्या दिवशी १५ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक
कपिल शर्मा, राजपाल यादवसह चार कलाकारांना बिष्णोईच्या नावे धमकीचा मेल
पुन्हा ‘देवाभाऊंचं अभिनंदन’ करावं लागणार बहुधा!
ट्रम्प यांनी लगावलेली ‘थप्पड की गुंज’ तुम्ही ऐकलीत का?
डी.के राव हा २०१७ च्या एका खंडणीच्या गुन्ह्यात २०२२ मध्ये जामिनावर बाहेर आला आहे. यासह त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला होता. याच दरम्यान, पुन्हा एकदा त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाण्याची माहिती आहे.