कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर- दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि गायिका- कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ईमेलचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. कलाकारांच्या तक्रारींवरून आंबोली आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, चारही कलाकारांना देण्यात आलेली धमकी ईमेलद्वारे मिळाली असून ईमेलच्या शेवटी बिष्णोई याचे नाव लिहिले आहे. पाठवलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, “आम्ही तुमच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून दिली आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला छळण्याचा यात उद्देश नाही. तुम्ही हा संदेश गांभीर्याने आणि गोपनीयतेने घ्यावा. पुढील आठ तासांमध्ये प्रतिसाद न दिल्यास व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असे आम्ही समजू आणि आम्ही आवश्यक ती कारवाई करू.” असे मेलमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा :
गाडीने उडवल्याने ११ जणांचा मृत्यू!
प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर
गोहत्या थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी!
पवई येथील कॉल सेंटरवर छापेमारी, ४ महिलांसह ७ जणांना अटक!
अलीकडच्या काळात लॉरेन्स गँगच्या नावाने कलाकार किंवा राजकारण्यांना धमकावल्याच्या अशा घटना समोर आल्या आहेत. ईमेलमध्ये केवळ या कलाकारांनाचं नाही तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. पोलिसांनी कलम ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासानुसार, ईमेलचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानचा आहे. सध्या या स्टार्स किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भात कोणतेही विधान जारी केलेले नाही.