28.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरक्राईमनामापश्चिम बंगालमधील खासगी शाळेतून १.४४ कोटी रुपये जप्त

पश्चिम बंगालमधील खासगी शाळेतून १.४४ कोटी रुपये जप्त

Google News Follow

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून १.४४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कांचरापाडा येथील एका खासगी शाळेत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेत राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान ही रक्कम जप्त करण्यात आली. गुरुवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत एकूण १ कोटी ४४ लाख रुपये सापडले. रोख रकमेव्यतिरिक्त शाळेतील ‘सिक रूम’ (आजारी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खोली) मधील कपाटातून कंडोमचे एक पाकीटही आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूरचे आमदार सुदीप्त दास आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक संस्थांचा ‘डेटा बँक’ तयार करत होते. त्यावेळी त्यांच्या प्रतिनिधींना या शाळेबाबत काही माहिती मिळाली. त्यानंतर सुदीप्त दास बुधवारी रात्री शाळेत पोहोचले आणि पोलिसांना पाचारण केले. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने नोटा मोजण्यासाठी मशीन मागविण्यात आली. नंतर रकमेचे प्रमाण लक्षात घेऊन आणखी मशीन आणण्यात आल्या.

सुदीप्त दास म्हणाले, “यापूर्वी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरातून मोठी रोख रक्कम सापडली होती. आता शाळेतून पैसे सापडले आहेत. या संस्थेबाबत गैरव्यवहाराचे आरोप सातत्याने होत होते. त्यानंतरच हे प्रकरण उघडकीस आले.” त्यांनी पुढे आरोप केला की, “ही रक्कम शाळेची नाही. तृणमूल काँग्रेसचे नेते कमल अधिकारी, सुबोध अधिकारी आणि पार्थ भौमिक यांचा हा काळा पैसा आहे. ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांच्या भीतीने त्यांनी ही रक्कम शाळेत लपवून ठेवली होती का?”

आमदारांनी दावा केला की, कांचरापाडा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष कमल अधिकारी हे शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. मात्र, या आरोपांवर कमल अधिकारी, सुबोध अधिकारी किंवा पार्थ भौमिक यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शाळेचे प्राचार्य विकास चंद्र पाल यांनी मात्र जप्त करण्यात आलेली रक्कम प्रवेश शुल्काची असल्याचा दावा केला. तसेच ‘सिक रूम’मध्ये कंडोमचे पाकीट कसे आले याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “प्रवेश प्रक्रियेदरम्यान एप्रिल महिन्यापासून ही रक्कम जमा होत होती. ती बँकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या रकमेचा संपूर्ण हिशेब लेखा विभागाकडे आहे.”

हे ही वाचा:

टॅरिफचा महसूल गेला वाहून! अमेरिकेचा सीमाशुल्क महसूल प्रथमच नकारात्मक

ममतांना दणका; राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांचा राजीनामा

होर्मुझजवळ जहाजावरील हल्ल्यानंतर दोन भारतीय खलाशी ठार; मुख्य अभियंता बेपत्ता

मणिपूर: बेपत्ता झालेल्या नागा समुदायातील सहा जणांचे सापडले मृतदेह

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम नेमकी कुठून आली आणि एवढी मोठी रक्कम शाळेत कशी जमा झाली याचा तपास सुरू आहे. तपासाचा अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे प्रशासनाचे मत आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने शाळेचे कॅशियर अभिक नाथ आणि सहाय्यक लेखापाल सायन घोष यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना कोलकात्यातील सुरेंद्रनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाच्या खोलीतील कपाटातून दीमक लागलेल्या नोटांनी भरलेली सूटकेस सापडल्याच्या घटनेनंतर अवघ्या एका आठवड्यात घडली आहे. त्या प्रकरणात शस्त्रे आणि गर्भनिरोधक औषधांची पाकिटेही सापडली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा