महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता दर्जा देण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी गुरांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहेत. चिपळूण तालुक्यामध्येही तसाच तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ही माहिती दिली. बुधवारी (२२ जानेवारी) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास चिपळूण तालुक्यामध्ये २२ जनावरे/गुरे सापडल्याचे त्यांनी सांगितले. काही हिंदुना संशय आल्यानंतर त्यांनी गाडीचा पाठलाग केल्यानंतर ही बाब उघडकीस आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निलेश राणे ट्वीटकरत म्हणाले, गाडीमधून गुरांना बाहेर काढताना त्यातील तीन गुरे गंभीर जखमी होते. जखमी गुरांना वैदकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांना याची माहिती दिली. परंतु, २४ तास उलटूनही पोलिसांनी एफआयआर अजूनही घेतलेली नाही. इक्बाल आणि त्याचा पार्टनर रिझवान यांची ही गाडी आहे.
तस्करीच्या बाबतीत या अगोदरही यांच्यावर गुन्हे दाखल असून हे लोक जामिनावर बाहेर आहेत. असे असूनही ते जनावरांची तस्करी करत आहेत. पुढे दोन गाड्या मध्यभागी जनावरांची गाडी आणि पाठीमागे पुन्हा दोन गाड्या, अशा जुन्या चित्रपटासारख्या शैलींचा वापर यांच्या तस्करीमध्ये असतो.
हे ही वाचा :
पवई येथील कॉल सेंटरवर छापेमारी, ४ महिलांसह ७ जणांना अटक!
केजरीवाल काँग्रेसच्या निशाण्यावर; ३८२ कोटींचा आरोग्याशी संबंधित घोटाळा केल्याचा आरोप
पाकिस्तानी डिझायनर म्हणतात, भारतीयांचे जीवन अधिक चांगले
२.५ इंचाचा पाठीत चाकूचा तुकडा, सहा तास शस्त्रक्रिया, सैफ पाच दिवसात फिट कसा?
तेथील डीवायएसपी यांच्याशी माझे बोलणे झाले असून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाहीतर आम्हाला कायदा हातामध्ये घ्यावा लागेल. यासाठी येणाऱ्या २५ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने जमायचे आहे. हे सर्व थांबले पाहिजे, यासाठी एकत्र जमले पाहिजे, असे निलेश राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, २५ जानेवारीच्या सभेमध्ये इक्बाल आणि रिझवान कसे तस्करी करतात याची माहिती देणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून गो-हत्या संदर्भात तस्करांविरुद्ध कडक कायदा करावा अथवा मोक्का कायदा लावावा अशी मागणी करणार असल्याचे निलेश राणेंनी सांगितले.
गोहत्या थांबवण्यासाठी आम्ही कुठलाही थराला जायला तयार आहोत… गोभक्तांनी येणाऱ्या २५ तारखेला संध्याकाळी ५ वाजता चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने एकत्र यावं. pic.twitter.com/cvEfvB3xC4
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 22, 2025