अभिनेता सैफ खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी अभिनेत्यावर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला होता. त्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर अभिनेत्याला काल (२१ जानेवारी) डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी दाखल होताना अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना हाय-हॅलो केले आणि कडक पोलीस बंदोबस्तात तो त्याच्या घराच्या इमारतीत शिरला. यावेळी त्याच्या मानेवर आणि हातावर पांढरी पट्टी असल्याचे दिसून आले. यावेळी तो फिट असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सैफच्या हल्ल्यावर आता शंका उपस्थित केली जात आहेत. कारण एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया पार पडली असेल तर त्याच्या हावभाव-हालचालीवरून ते दिसून येते. मात्र, सैफच्या बघण्यावरून असे काही दिसून आले नाही. त्यामुळे हल्ल्यावरून विविध प्रश्न निर्माण केले जात आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी तर प्रश्न उपस्थित करत सैफ इतका फिट कसा, असा सवाल केला आहे.
लीलीवती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या स्टेटमेंटवर देखील आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपचारादरम्यान अभिनेत्याच्या पाठीतून चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला होता. मणक्याला जर मार लागला असता तर सैफ कोम्यात गेला असता, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे पाच दिवसात बरा होवून आलेल्या सैफवर आता बोट ठेवले जात आहे. केवळ पाच दिवसात सैफ एवढा फिट कसा यावर प्रश्न विचारले जात आहेत.
हे ही वाचा :
केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे
वक्फ बोर्डाने दावा केलेल्या जमिनीपैकी ७८ टक्के जमीन सरकारच्या
अमेरिकेचे उपाध्यक्ष वेन्स यांचे आहे भारताशी असे ‘नाते’
दावोसमधून पहिल्याचं दिवशी सहा लाख कोटींहून अधिकची विक्रमी गुंतवणूक
संजय निरुपम यांनी ट्वीटकरत म्हटले, “सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. १६ जानेवारीची ही गोष्ट आहे आणि आज २१ जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच इतका फिट? केवळ पाच दिवसात? कमाल आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले.
एएनआयशी बोलताना संजय निरुपम म्हणाले, सैफवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या पाठीत चाकूचा अर्धा तुकडा आणि आर्धा तुकडा घरामध्ये सापडला. हा कोणता चाकू आहे जो पाठीत जाऊन तुटला?. तसेच जेव्हा हल्लेखोर इमारतीमध्ये आला आणि बाहेर गेला, याचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज समोर नाहीयेत. या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना आणि सैफच्या परिवाराला द्यावी लागणार आहेत कारण कि परिवाराच्या सुरक्षेवरून संपूर्ण देश चिंतेत होता, मुंबईतील संपूर्ण जनता व्यतिथ होती, जनतेच्या मनात भीती निर्माण झाली होती.
डॉक्टरों का कहना था कि
सैफ अली खान की पीठ में 2.5 इंच अंदर तक चाकू घुसा था।
संभवत: अंदर ही फँसा था।
लगातार 6 घंटे ऑपरेशन चला।
यह सब 16 जनवरी की बात है।
आज 21 जनवरी है।
अस्पताल से निकलते ही इतना फिट ?
सिर्फ़ 5 दिन में ?
कमाल है !#SaifAliKhan pic.twitter.com/7tCT9g0jx8— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 21, 2025