मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दावोस दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यामधून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आणली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या दिवशी ६,२५,४५७ कोटींवर गुंतवणूक करार झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार केले जाणार आहेत. दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सहा लाख कोटींहून अधिक रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. यात ३१ करार झाले आहेत.
Maharashtra is creating history..🚩
Maharashtra bags whopping ₹6,25,457 crore of investments at Davos in just one day under the leadership of CM Devendra Fadnavis !
And this is just the beginning…
To be contd…@Dev_Fadnavis @wef#WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos pic.twitter.com/SNJGGdoIHt— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2025
हे करार ऑटोमोटिव्ह, पोलाद, संरक्षण, इलेक्ट्रिक वाहने, नूतनीकरणक्षमता आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये झाले आहेत. राज्य सरकारसोबत करार केलेल्या कंपन्यांच्या यादीत टाटा ग्रुप, सीएट, एस्सार रिन्यूएबल्स, भारत फोर्ज, वेलस्पन कॉर्प, रिलायन्स इन्फ्रा आणि ऑलेक्ट्रा ग्रीनटेक यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :
केरळचे पिनराई सरकार अडचणीत; पीपीई किट खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा!
अकोला जिल्हात १५,८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा!
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक
“महाकुंभामध्ये जीवनाचा निःस्वार्थ, शुद्ध, आनंदी, शांत आणि चैतन्यपूर्ण अनुभव आहे”
दरम्यान, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी पहिला सामंजस्य करार हा ५,२०० कोटींचा केला. ही गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलाद निर्मितीसाठी कल्याणी समूहाकडून कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या करारामधून तब्बल ४,००० रोजगार निर्मितीही होणार आहे.