28.4 C
Mumbai
Friday, August 14, 2026
घरक्राईमनामाजंतर-मंतर आंदोलनात दिसलेला व्यक्ती निघाला फसवणूक प्रकरणातील आरोपी

जंतर-मंतर आंदोलनात दिसलेला व्यक्ती निघाला फसवणूक प्रकरणातील आरोपी

पीडिताने सोशल मीडियावरील व्हिडिओतून ओळखले

Google News Follow

Related

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनादरम्यान दिसलेल्या एका व्यक्तीची ओळख राजस्थानमधील १७ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी म्हणून पटली आहे. झुंझुनू येथील रहिवासी साजिद दिवान यांनी सोशल मीडियावर आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ पाहताना संबंधित व्यक्तीला ओळखले. त्यानंतर त्यांनी तातडीने राजस्थान पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, साजिद दिवान यांनी जंतर-मंतर आंदोलनाचे सोशल मीडिया पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ पाहिले. त्यामध्ये त्यांना रामचंद्र नावाची व्यक्ती दिसली. दिवान यांनी या व्यक्तीला आपण दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीतील आरोपी म्हणून ओळखले. माहिती मिळताच झुंझुनू कोतवाली पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात सुमारे दोन दिवस आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवली. रामचंद्र आंदोलनाच्या मंचाजवळ तसेच आयोजक आणि इतर आंदोलकांसोबत दिसल्याचे पोलिसांनी सांगितले.

साजिद दिवान यांच्या तक्रारीनुसार, त्यांची रामचंद्र याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. यापूर्वी त्यांनी त्याच्याकडून टोयोटा फॉर्च्युनर खरेदी केली होती. या व्यवहारामुळे विश्वास निर्माण झाल्यानंतर मार्च २०२४ मध्ये त्यांनी रेंज रोव्हर डिफेंडर- १३० खरेदीसाठी रामचंद्रशी संपर्क साधला. तक्रारीनुसार, या वाहनासाठी साजिद यांनी दोन टप्प्यांत कंपनीच्या बँक खात्यावर RTGSद्वारे पैसे पाठवले. ६ मार्च २०२४ रोजी ७ लाख रुपये, तर ८ मार्च २०२४ रोजी आणखी १० लाख रुपये पाठवण्यात आले. मात्र, वाहन मिळाले नाही आणि पैसेही परत करण्यात आले नसल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानावरील नियंत्रण ४ सेकंदांसाठी सुटले होते!

दुबईत लपलेला ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोया भारताच्या ताब्यात

टॅरिफ चुकवण्यासाठी चीनकडून भारताचा वापर? ४० देशांवर अमेरिकेचा आरोप

‘टिप द्या, राइड मिळवा’चा फंडा बंद; केंद्राचा उबर-ओलासह सर्व ऍप्सना आदेश

या प्रकरणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झुंझुनू कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून रामचंद्रचा शोध सुरू होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, जंतर-मंतर आंदोलनाचे व्हिडिओ पाहताना पीडितानेच त्याला ओळखल्याने पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा धागा मिळाला. झुंझुनू कोतवालीचे SHO श्रवण कुमार यांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे आणि पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी दिल्लीला गेल्याचे पुष्टी केली आहे.

पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी मोठी गर्दी असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी तातडीने अटक करण्याऐवजी त्याच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा