बांगलादेशी आणि रोहिंग्याविरुद्ध सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. अकोला जिल्हात १५,८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा घडला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्ह्यातील सात तहसील कार्यालयाची आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यानी जन्म प्रमाणपत्र/दाखले मिळविले आहेत.
बनावटी दस्तावेज द्वारा अकोला जिल्हा येथे जन्म झाल्याचे प्रमाणपत्र/दाखला मिळविला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. अकोला जिल्हात १५,८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा घडला दावा सोमय्या यांनी केला आहे. अकोला ४८४९, अकोट १८९९, बाळापूर १४६८, मुर्तिजापूर १०७०, तेल्हारा १२६२, पातूर ३९७८, बार्शिटाकळी १३१९, एवढ्या प्रमाणात बनावट कागदपत्र वापरून जन्माचा दाखला मिळवला असल्याचा सोमय्या यांचा दावा आहे. किरीट सोमय्या यांनी ही माहिती एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानंतर आता महायुती सरकार काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा :
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक
“महाकुंभामध्ये जीवनाचा निःस्वार्थ, शुद्ध, आनंदी, शांत आणि चैतन्यपूर्ण अनुभव आहे”
सैफ अली खान अडचणीत; पतौडी कुटुंबाची १५ हजार कोटींची मालमत्ता होणार जप्त?
महाकुंभमेळ्यातील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ने स्वीकारली
दरम्यान, अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा देखील बांगलादेशी असल्याचे समोर आले होते. यानंतर किरीट सोमय्या यांनी आरोपी काम करत असलेल्या ठाण्यातील कॅम्पला भेट दिली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता १२ पैकी ९ बांगलादेशी असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्यात आली असून अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली.
अकोला जिल्हात 15,845 बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा
अकोला 4849
अकोट 1899,
बाळापूर 1468
मुर्तिजापूर 1070
तेल्हारा 1262
पातूर 3978
बार्शिटाकळी 1319
बनावटी दस्तावेज द्वारा अकोला जिल्हा येथे जन्म झाल्याचे प्रमाणपत्र/दाखला मिळविला@Dev_Fadnavis pic.twitter.com/3EmYJEebJL
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 22, 2025