वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडची आज (२२ जानेवारी) पोलीस कोठडी संपणार होती. मागील सात दिवसांपासून वाल्मिक कराड पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
वाल्मिक कराडला ऑनलाईन पद्धतीने कोर्टात हजार करण्यात आले होते. आरोपीचे आणि फिर्यादीचे दोनही वकील समोर होते. यावेळी आरोपींच्या वकिलांकडून आणि सीआयडीकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने मागणी पूर्ण करत वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
हे ही वाचा :
अकोला जिल्हात १५,८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा!
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक
“महाकुंभामध्ये जीवनाचा निःस्वार्थ, शुद्ध, आनंदी, शांत आणि चैतन्यपूर्ण अनुभव आहे”
सैफ अली खान अडचणीत; पतौडी कुटुंबाची १५ हजार कोटींची मालमत्ता होणार जप्त?
दरम्यान, वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, मला थोड आश्चर्य वाटत आहे कारण पोलिसांचा तपास पूर्ण झाला. इतक्या लवकर त्याला न्यायालयीन कोठडी का देण्यात यावी. काल एक वाल्मिक करडचा व्हिडीओ समोर आला होता, त्याची चौकशी बाकी आहे, त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीमुळे पश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेवून त्यांना सत्य परिस्थिती सांगितली असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.