28.7 C
Mumbai
Tuesday, May 5, 2026
घरराजकारणभाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय; तुष्टीकरणाचा कडेलोट

भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय; तुष्टीकरणाचा कडेलोट

ममतांची १५ वर्षांची सत्ता उखडली

Google News Follow

Related

४ मे २०२६ हा दिवस भारताच्या राजकीय इतिहासात मोठ्या उलथापालथींचा दिवस म्हणून नोंदवला जाईल. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून तृणमूल काँग्रेसला जबर तडाखा दिला आणि राज्यात पहिल्यांदाच सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला. दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजयच्या टीव्हीके पक्षाने जबरदस्त पदार्पण करत राज्याच्या राजकारणात मोठी ताकद म्हणून उदय घेतला.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला ७९ जागी यश मिळाले गेल्या निवडणुकीत २१५ जागा जिंकणारा तृणमूल १०० जागाही जिंकू शकला नाही. भाजपने मात्र ७७ जागांवरून २०७ जागांपर्यंत झेप घेऊन प्रचंड मोठे यश मिळवले. बंगालमधील भाजपचा हा पहिला विजय ठरला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधी असलेल्या रोषाला वाट मोकळी मिळाली.

बंगालमधील विजयाचे प्रमाण स्पष्ट होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाला सुशासन आणि बदलासाठी जनादेश म्हणून मांडले. “आमचा मंत्र ‘नागरिक देवो भव’ आहे. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणूनच जनतेने भाजपवर विश्वास दाखवला,” असे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने २९४ सदस्यांच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवत तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपवली. तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला, जो अलीकडच्या काळातील त्यांच्या सर्वात खराब कामगिरींपैकी एक ठरला. भवानीपूरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात ममता यांचा भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव झाला, ज्यामुळे हा मोठा राजकीय धक्का ठरला.

बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसला मात्र अवघ्या २ जागी यश मिळाले.

विजयचा करिष्मा

दरम्यान तामिळनाडूमध्ये विजयच्या तामिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाने २३४ पैकी सुमारे १०७ जागांवर आघाडी घेतली किंवा विजय मिळवला असून बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. निवडणूक आयोगाच्या कलानुसार डीएमके दुसऱ्या क्रमांकावर असून एआयएडीएमके आणखी मागे आहे.  एआयएडीएमकेच्या खात्यात ५३ तर डीएमकेच्या खात्यात ७४ जागा होत्या. विजयने प्रथम विधानसभा निवडणुकीत भाग घेतला

हे ही वाचा:

प.बंगाल नाही, भाजपाने २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकली…

गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळच कमळ!

केरळमध्ये भाजपाची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच ३ जागा जिंकल्या

तामिळनाडूमधील कोलाथूरमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत

 

 

पाच वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराभवातून सावरत, यूडीएफ या काँग्रेस-नेतृत्वाखालील आघाडीने केरळमध्ये जोरदार पुनरागमन केले असून १४० पैकी ९९ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान,  सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील एलडीएफ ९४ वरून केवळ ३५ जागांवर घसरला आहे. भाजपने  (भाजप) नेही राज्यात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. भाजपला याआधी २०१६ मध्ये १ जागा मिळाली होती. पण यावेळी ३ जागी यश मिळाले आहे.

आसाममध्ये भाजपने ६४ च्या बहुमताचा टप्पा ओलांडला असून एनडीएने एकूण १०२ जागा जिंकल्या आहेत. त्याउलट    काँग्रेस) नेतृत्वाखालील आघाडीला फक्त २१ जागा मिळाल्या.

पुदुच्चेरीमध्ये एनडीएने सत्ता कायम राखली असून ऑल इंडिया एनआर काँग्रेस) या आघाडीचे नेतृत्व करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
305,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा