मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले असून पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अटक करण्यात आली असून यातील एक जण पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) सदस्य होता तर दुसरा बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य होता.
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवार, २२ जानेवारी रोजी पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मंगळवारी टोप खोंगनांगखोंग येथून बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका सक्रिय सदस्याला अटक करण्यात आली. येंगखोम भोगेन सिंग (वय ५० वर्षे) असे त्याचे नाव आहे. तर, बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (एमएफएल) एका सदस्याला मंत्रीपुखरी बाजार येथून अटक करण्यात आली आहे. पुखरामबम थोइबा सिंग (वय ३८ वर्षे) असे त्याचे नाव आहे.
STORY | Two militants arrested in Manipur
READ: https://t.co/vL9ShWvTLu pic.twitter.com/U1EWpdWz6j
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2025
हे ही वाचा :
“महाकुंभामध्ये जीवनाचा निःस्वार्थ, शुद्ध, आनंदी, शांत आणि चैतन्यपूर्ण अनुभव आहे”
सैफ अली खान अडचणीत; पतौडी कुटुंबाची १५ हजार कोटींची मालमत्ता होणार जप्त?
महाकुंभमेळ्यातील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ने स्वीकारली
तेजस एक्स्प्रेस बंद पडली; चाकरमान्यांना झाला प्रचंड मनस्ताप!
यापूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारीच्या पहाटे १ च्या सुमारास दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांनी अनेक राऊंड गोळीबार केला आणि बॉम्ब फेकले. तर, यापूर्वीचं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यांनी मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल खेद व्यक्त केला. तसेच आगामी वर्षात संपूर्ण राज्यात स्थिती पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली.