प्रयागराजमधील महाकुंभ हे जागतिक पातळीवरचे आकर्षण बनले असून देश- विदेशातून भाविक महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत. काही विदेशी ‘महामंडलेश्वरांनी’ही महाकुंभ मेळ्यात सहभागी होत सनातन धर्माची प्रशंसा केली. शिवाय या भव्य कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्याच्या प्रयत्नांसाठी सरकारचे कौतुकही केले. सनातन धर्मात प्रेम आणि आपुलकीची भावना अतुलनीय आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
टोकियो, जपानमधील अध्यात्मिक नेत्या राजेश्वरी माँ महामंडलेश्वर यांनी कुंभमेळा आणि सनातन धर्मातील त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाविषयी आपले विचार ‘एएनआय’शी बोलताना व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “मी अनेक परंपरा पाहिल्या आणि जेव्हा मी माझ्या गुरू, जगतगुरु सम लक्ष्मी देवी यांना भेटले, तेव्हा मी शिकत असलेली प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी एकत्र आली. सर्व काही सनातन धर्मात होते. आत्मा विषयी शिकणे, स्वतः बद्दल आणि सर्व उत्तरे आत आहेत हे समजून घेणे. हे एक विज्ञान आहे जे आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते.”
कुंभाच्या तयारीबाबत, राजेश्वरी माँ यांनी आयोजकांचे कौतुक केली, “कुंभची तयारी आश्चर्यकारक आहे. हा माझा चौथा कुंभ आहे आणि सरकारने सर्वकाही एका ठिकाणी आणून एक अविश्वसनीय काम केले आहे.” तसेच त्यांनी महाकुंभ मेळ्याच्या भव्यतेचे कौतुक करत म्हटले की, येथे ४० करोड लोक येत असताना मी अनुभवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कुंभ आहे. आणि आतापर्यंत सर्व काही अगदी सुरळीत झाले आहे.
महामंडलेश्वर, अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ यांनीही कुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचा आणि सनातन धर्माच्या शिकवणीचा खोल परिणाम याविषयी आपले विचार मांडले. त्यांनी म्हटले की, “मी प्रत्येक कुंभासाठी येतो कारण इथे जीवनाचा अनुभव आहे. हा अनुभव निःस्वार्थ, शुद्ध, आनंदी, शांत आणि चैतन्यपूर्ण आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस इथे जगू इच्छितो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी सनातन धर्माच्या परिवर्तनात्मक स्वरूपावर भर देताना सांगितले की, “सनातन धर्म आपल्याला शांती, आनंद आणि पूर्तता मिळवून देतो. हा धर्माचा मार्ग, सनातन धर्माचा मार्ग आहे, कारण तो आपल्याला त्या मार्गांनी जीवनाचा अनुभव घेऊ देतो.”
हे ही वाचा :
सैफ अली खान अडचणीत; पतौडी कुटुंबाची १५ हजार कोटींची मालमत्ता होणार जप्त?
महाकुंभमेळ्यातील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ने स्वीकारली
तेजस एक्स्प्रेस बंद पडली; चाकरमान्यांना झाला प्रचंड मनस्ताप!
सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, ६ दिवसानंतर घरी परतला!
फ्रान्समधील हयेंद्रदास महाराज महामंडलेश्वर यांनी कुंभमेळ्याशी असलेला त्यांचा संबंध आणि सनातन धर्मातून त्यांचा होत असलेला जीवन प्रवास याविषयी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “मी कुंभासाठी येथे आलो आहे, भारतात आलो आहे जिथे प्रत्येक श्वास हा ‘शक्ती’ने भरलेला आहे. हे उपासना, भक्ती, सकारात्मक ऊर्जा, प्रेम आणि शांततेचे जग आहे.” मी कुंभासाठी येथे आलो आणि अध्यात्मिक रिचार्ज करण्यासाठी आलो आहे. पुढे ते म्हणाले की, “मी माझ्या गुरूंना भेटल्यावर सनातनमध्ये सामील झालो. ही ४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हापासून मी कधीही हा मार्ग सोडलेला नाही.