अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी (२१ जानेवारी) मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी अभिनेत्यावर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला होता. त्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज अखेर उपचारानंतर सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
लीलावतीच्या डॉक्टरांनी सांगितले होते की, सैफला बरे होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. तो पूर्णपणे बरा होईपर्यंत डॉक्टरांनी त्याला वजन उचलण्यास, जिममध्ये जाण्यास आणि शूटिंग करण्यास मनाई केली आहे आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.
हे ही वाचा :
नवा सीसीटीव्ही…वाल्मिक कराडसह सर्व आरोपी एकत्र
उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप!
अमेरिकेत घुसखोरांना स्थान नाही; ट्रम्प यांच्याकडून मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी
देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!
यामध्ये तो संपूर्ण ठीक आणि ठणठणीत झाल्याचे दिसत आहे. यावेळी सैफ अली खानने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि जिन्स असे कपडे परिधान केले होते. गाडीतून उतरल्यानंतर सैफने त्याच्या चाहत्यांना हाय-हॅलो केले आणि कडक पोलीस बंदोबस्तात तो त्याच्या घराच्या इमारतीत शिरला. अभिनेता सैफ अली खान आता फॉर्च्युन हाइट्समध्ये राहण्यासाठी गेला आहे. हे त्याचे दुसरे असून ते वांद्र्यातील त्याच्या राहत्या निवासस्थानाच्या बाजूला आहे.
दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ शहजाद याला मुंबई पोलिसांनी १९ जानेवारी रोजी ठाण्यातून अटक केली होती. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवकरात लवकर या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपासासाठी अनेक पथके तयार करत आहे.