बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित करण्यात आले आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या एक महिन्यापासून फरार आहे. अखेर पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. आरोपी कृष्णा आंधळे पाहिजे आहे अशी प्रसिद्धी पत्रके जारी करण्यात आली आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकूण ९ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. यामध्ये आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. आता आरोपीला फरार घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यावा या मागणीसाठी आज (२२ जानेवारी) पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चात सामील झाले. उर्वरित आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली. याच दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडची आज पोलीस कोठडी संपली. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा :
केरळचे पिनराई सरकार अडचणीत; पीपीई किट खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा!
वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
अकोला जिल्हात १५,८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा!
“महाकुंभामध्ये जीवनाचा निःस्वार्थ, शुद्ध, आनंदी, शांत आणि चैतन्यपूर्ण अनुभव आहे”