रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अभिनेता सैफ खान विश्रांती घेत आहे. १६ जानेवारी रोजी अभिनेत्यावर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला होता. त्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर अभिनेत्याला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी दाखल होताना अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना हाय-हॅलो केले आणि कडक पोलीस बंदोबस्तात तो त्याच्या घराच्या इमारतीत शिरला.
यावेळी त्याच्या मानेवर आणि हातावर पांढरी पट्टी असल्याचे दिसून आले. यावेळी तो फिट असल्याचे दिसून आले. मात्र आता एकंदर या घटनेवरून शंका उपस्थित केली जात आहे. भाजपा मंत्री नितेश राणे यांनी देखील सवाल उपस्थित केला आहे. सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला कि अभिनय करत होता, असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राणे म्हणाले की, “सैफ अली खानला डिस्चार्ज दिल्यानंतर जेव्हा मी पाहिले तेव्हा मला शंका आली की खरोखरच त्याच्यावर हल्ला झाला कि त्याने अभिनय केला. यावेळी विरोधकांवर हल्ला चढवत नितेश राणे म्हणाले, जेव्हा एखाद्या खानवर, शाहरुख खान, सैफ अलीखान वर हल्ला होतो तेव्हा सगळे टीवटीव करत उठतात. एखाद्या हिंदू अभिनेत्यावर हल्ला झाला, दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे काय झाले. त्यावेळी मुंब्र्याचा जीतुद्दिन, बारामतीची ताई बाहेर आली नाही.
ते पुढे म्हणाले, “सुप्रिया सुळे यांना सैफ अली खान, शाहरुख खानचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची काळजी आहे. यांनी कधी हिंदू कलाकाराबद्दल काळजी केलेली नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले.
हे ही वाचा :
लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव! १०,००० एकर क्षेत्र जळून खाक
‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या बांगलादेशी महिलेला मुंबईतून अटक
छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक!
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमधून दुसऱ्या दिवशी १५ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी देखील शंका उपस्थित केली होती. “सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. रुग्णालयातून बाहेर पडताच इतका फिट? केवळ पाच दिवसात? कमाल आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले होते.