27 C
Mumbai
Friday, February 27, 2026
घरविशेषराहुल गांधींनी माझा मोबाईल नंबर सार्वजनिक केला, मी तक्रार करेन!

राहुल गांधींनी माझा मोबाईल नंबर सार्वजनिक केला, मी तक्रार करेन!

राहुल गांधींच्या पीसीवर फोननंबर दिसल्यानंतर अंजनी मिश्रा यांची प्रतिक्रिया 

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित “मत चोरी” प्रकरणी पत्रकार परिषदेत त्यांचा मोबाईल नंबर प्रदर्शित झाल्यानंतर अंजनी मिश्रा नावाच्या व्यक्तीने शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सांगितले की, त्यांना सतत फोन कॉल येत होते आणि आता ते पोलिसांशी संपर्क साधण्याचा विचार करत आहेत.

अंजनी मिश्रा म्हणाले,”राहुल गांधींनी माझा फोन नंबर थेट पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. त्यामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. त्यांनी असा दावा केला की महाराष्ट्रात मतं चोरी झाली आहेत आणि माझे मतदार ओळखपत्र (Voter IDs) डिलिट करण्यात आले , जे पूर्णपणे खोटं आहे. मी कधीच महाराष्ट्रात गेलो नाही, ना माझं महाराष्ट्राशी काही संबंध आहे. त्यामुळे माझं मतदार ओळखपत्र तिथे तयार होणं किंवा रद्द होणं शक्यच नाही.”

ते पुढे म्हणाले, “हे एक खोटं आरोपपत्र होतं आणि त्यात माझा नंबर दाखवण्यात आला. त्यामुळे आता मला अनोळखी, फसवणूक करणारे आणि खोटे फोन कॉल्स येत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून मी हा नंबर वापरतो आहे आणि याआधी कधीही असा त्रास झाला नाही. हा प्रकार माझ्या गोपनीयतेचा स्पष्ट उल्लंघन आहे. मी याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.”

दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत मतचोरीचे आरोप केले. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आणि त्यांना “चुकीचे आणि निराधार” म्हटले, तर जनतेद्वारे कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन हटवले जाऊ शकत नाही यावर भर दिला. प्रभावित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही नाव हटवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

‘नेपाळ मॉडेल भारतात लागू करायचंय का? तिथे तर राजघराणं पाडलं’

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अभाविपचा अध्यक्ष, डाव्या संघटनांचा सुपडा साफ

सॅम पित्रोदा म्हणतात- पाकिस्तान-बांगलादेशमध्ये नेहमी घरच्यासारखं वाटलं!

मुरीदके कॅम्प उद्ध्वस्त: ऑपरेशन सिंदूरवर जैशनंतर लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचीही कबुली!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा