24 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषराहुल गांधी यांच्या नीती आणि नीयतीत खोट

राहुल गांधी यांच्या नीती आणि नीयतीत खोट

Google News Follow

Related

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर सोमवार (२१ एप्रिल) रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचले. या वेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकुर म्हणाले, “काँग्रेसचे युवराज नेहमीच विदेशात भारताची बदनामी करण्याचे काम करतात. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकुर म्हणाले, “ज्यांनी ६० वर्षे देशावर राज्य केले, त्यांना जर निवडणुकीत हार पत्करावी लागली तर ते आत्मचिंतन करत नाहीत, की जनतेने त्यांना नाकारले का? काँग्रेसमध्ये आता अंतर्गत लोकशाही उरलेली नाही, ती एकाच कुटुंबापुरती सीमित झाली आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यांमध्ये भारत आणि त्याच्या संस्था यांच्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते कधी EVM वर ठीकरा फोडतात, तर कधी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारतात. काँग्रेस हीच ती पार्टी आहे, जिने रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवले होते.”

भीमराव आंबेडकर सन्मान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटणाला आलेल्या ठाकुर यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर अधिक टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसकडे बिहारमध्ये काहीच शिल्लक नाही – ना नेता, ना नीती आणि त्यांच्या नीयतीतही खोट आहे. काँग्रेसने जेंव्हा जेंव्हा इथे कोणालाही पाठिंबा दिला आहे, तेंव्हा बिहारमध्ये जंगलराजच आले आहे. बिहारचे नागरिक विकास इच्छितात आणि भाजप-जेडीयूच्या सरकारने उत्तम कामगिरी केली आहे.

हेही वाचा..

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर न्यायमूर्ती गवई काय म्हणाले ?

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस सोमवारी जयपूरला दाखल होणार

राणी मुखर्जी अभिनीत ‘मर्दानी ३’ च्या रिलीज डेटची घोषणा

“परदेशी भूमीवर राहुल गांधींची ‘भारत बदनाम यात्रा’”

ते पुढे म्हणाले, “केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून बिहारला नवीन उंचीवर नेत आहेत. पुढची पाच वर्षेही बिहारसाठी अत्यंत महत्त्वाची असतील, कारण रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रेल्वे यांसारख्या क्षेत्रात केलेले काम खूप उल्लेखनीय आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पुन्हा एकदा बिहारमध्ये NDA सरकार येणार आहे.”

पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्यावर बोलताना ठाकुर म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या बिहारप्रेमाबद्दल सर्वांना माहिती आहे. त्यांनी मखाना बोर्डची स्थापना केली, गंगा नदीवर पूल बांधले, रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विस्तारले. बिहारला मोठ्या संधी मिळाल्या आहेत आणि मोदी-नीतीश कुमार हे दोघे राज्याचा विकास करत राहतील. आपल्या बिहार दौऱ्याबाबत माहिती देताना, ठाकुर म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभर साजरी करण्यात आली. पंचतीर्थ स्थापन करून भाजपा सरकारने बाबासाहेबांना योग्य सन्मान दिला. भारतरत्न देण्याचे कामही आमच्या सरकारच्या पाठिंब्याने झाले. पण, २०१२ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात NCERT च्या पुस्तकात नेहरूंना आंबेडकरांना फटके मारताना दाखवले गेले होते. काँग्रेसने यासाठी माफी मागायला हवी. नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायला लावला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले.”

निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर, ठाकुर म्हणाले, “आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. भाजप संविधानिक संस्थांचा सन्मान करते, परंतु काँग्रेसने नेहमीच त्यांचा अपमान केला आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा