26 C
Mumbai
Monday, January 5, 2026
घरविशेषरजत पाटीदारचे सिम कार्ड घेतले, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारल्या!

रजत पाटीदारचे सिम कार्ड घेतले, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारल्या!

खरे कारण समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

Google News Follow

Related

छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यातील देवभोग तालुक्यातील मडागाव येथील मनीष आणि खेमराज या दोन मित्रांच्या आयुष्यात जणू काही फिल्मी वळणच आलं. एका किराण्याच्या दुकानातून मनीषने २८ जून रोजी एक नवीन सिमकार्ड घेतलं. सर्वसामान्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याने जेव्हा सिम सुरू केलं आणि व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केलं, तेव्हा त्या नंबरवर रजत पाटीदारचा फोटो प्रोफाईलवर दिसला.

त्यांना वाटलं की कुणीतरी मजा करतोय. पण काही दिवसांनी त्यांना कॉल्स येऊ लागले – आणि कोणी म्हणत होतं, “हॅलो! मी विराट कोहली बोलतोय”, तर दुसरा म्हणत होता “मी एबी डिव्हिलियर्स आहे.” सुरुवातीला त्यांनी हे प्रँक समजून गमतीने घेतलं आणि उलटपक्षी स्वतःला “एम.एस. धोनी” म्हणून ओळखवू लागले.

१५ जुलैला मनीषला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोनवर एक शांत आणि विनम्र आवाज होता – “भाऊ, मी रजत पाटीदार बोलतोय. हा नंबर माझा आहे, कृपया तो परत करा.” पण मनीष आणि खेमराज अजूनही गमतीच्या मूडमध्ये होते. त्यांनी उत्तर दिलं – “आणि आम्ही एम.एस. धोनी आहोत!”

पाटीदारने समजावलं की हा नंबर त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण याच नंबरवरून तो आपल्या कोच, मित्र आणि क्रिकेट जगतातील लोकांशी संपर्कात असतो. पण जेव्हा दोघं गमतीतून काहीच ऐकत नव्हते, तेव्हा पाटीदार म्हणाला – “ठीक आहे, मी पोलीस पाठवतो.” आणि १० मिनिटांत पोलीस त्यांच्या घरी हजर झाले. तेव्हा मनीष आणि खेमराजला कळलं की ते खरोखरच विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि रजत पाटीदारसारख्या स्टार्सशी संवाद साधत होते. यानंतर त्यांनी तत्काळ सिमकार्ड परत केलं.

हे ही वाचा : 

रेल्वे नेटवर्कमध्ये ऑपरेशनल वंदे भारत ट्रेन्सची संख्या १४४ पर्यंत

वंदे भारत : मंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मूच्या नागरिकांना शुभेच्छा

१६० जागा मिळवण्याची हमी देणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही?

ऑपरेशन सिंदूरने जगाला नव्या भारताचे दर्शन घडवले

संपूर्ण प्रकरण काय?

खरे तर, या घटनेची कहाणी ऐकून सर्वांना आश्चर्य वाटेल. झाले असे की, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यांचा जुना नंबर ९० दिवसांपेक्षा जास्त काळ सक्रिय नव्हता. वृत्तानुसार, या नंबरवर रिचार्ज नसल्याने, टेलिकॉम प्रोव्हायडरने हा नंबर निष्क्रिय केला आणि पुन्हा नव्याने तो विक्रीस काढला. यानंतर छत्तीसगढच्या मनीषने नव्याने घेतलेल्या सीमकार्ड मार्फत त्याला हा नंबर मिळाला आणि हा सर्व घोळ झाला. दरम्यान, विराट कोहलीचा चाहता असलेल्या मनीषने ही घटना अविस्मरणीय असल्याचे वर्णन केले. “मला आशा आहे की कधीतरी पाटीदारांना भेटेन,” असे तो म्हणाला. तर मनीषचा मित्र खेमराज म्हणाला, “चुकीच्या नंबरमुळे मला कोहलीशी बोलण्याची संधी मिळाली, माझ्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण झाले”.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा