रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संस्थेतर्फे रविवारी गुणवंत सदस्य व दहावी,बारावी,पदवीधर व अन्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या मुलांचा कौतुक सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे अध्यक्ष मोतिराम विश्वासराव, कार्याध्यक्ष सहदेव सावंत, सरचिटणीस जितेंद्र पवार, समाज उत्कर्ष समितीचे अध्यक्ष सुबोध बने, संस्थेचे सल्लागार एकनाथ दळवी, प्रमोद पंडित व माजी उपकार्याध्यक्ष मनोहर कदम यानी दिप प्रज्वलन करून केले.

प्रास्ताविक सरचिटणीस जितेंद्र पवार यांनी केले. ३५ गुणवंत विदयार्थ्यांचा रोख पारीतोषिक व पुप्षगुच्छ देऊन तर ०९ गुणवंत सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात विदयार्थी व सदस्यांनी र.जि.म.ज्ञा.स.संस्था चालवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. समाज उत्कर्ष समितीचे अध्यक्ष सुबोध बने यांनी सर्व सदस्यांनी संस्थेच्या उपक्रमात सहभागी होऊन विधायक सुचना कराव्यात असे सुचवले कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “हे मिळालेले यश ही तर सुरवात आहे,अजुन ध्येयाचा मोठा टप्पा गाठायचा आहे” असा संदेश सर्वांना देताना बुद्धीबळ वर्ल्डकप जिंकलेल्या दिव्या देशमुखचे उदाहरण दिले. अध्यक्ष मोतिराम विश्वासराव यांनी सुरवाती पासुन कठीण परीस्थितीत संस्था मोठी करणार्‍या सदस्यांना धन्यवाद देऊन आर्थिक दृष्ट्या आपली संस्था सक्षम करण्यासाठी सर्व सदस्यांना आवाहन केले.

हेही वाचा..

एसआयआरवर लोकांना विरोधक गोंधळात टाकताहेत

मंत्री पद गेलं पण मुंडेंना बंगला काही सुटेना, दंडही गेला ४२ लाखांवर! 

इंडी आघाडी राम, सनातन आणि हिंदू विरोधी

‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे जागृत झाले राष्ट्रप्रेम

सूत्रसंचालन संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी केले तर आलेल्या सर्व सदस्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन आभार आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे सीईओ दिपक खानविलकर यांनी मानले. याप्रसंगी उपकार्याध्यक्ष अशोक परब खजिनदार विनोद बने, सचिव यशवंत साटम,सहखजिनदार विजय खामकर, का.सदस्य सचिन खानविलकर, उमाकांत कदम, सुशिल चव्हाण व सौ.ईंद्रायणी सावंत यांनी उपस्थित राहून गुणवंताना शुभेच्छा दिल्या. शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version