27.9 C
Mumbai
Wednesday, June 24, 2026
घरविशेषमंत्री पद गेलं पण मुंडेंना बंगला काही सुटेना, दंडही गेला ४२ लाखांवर! 

मंत्री पद गेलं पण मुंडेंना बंगला काही सुटेना, दंडही गेला ४२ लाखांवर! 

मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत 

Google News Follow

Related

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांना वास्तव्यासाठी देण्यात आलेला ‘सातपुडा’ बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर या बंगल्यात वास्तव्यास येण्यासाठी मंत्री छगन भुजबळ सध्या प्रतीक्षेत आहेत. मंत्री पदाचा राजीनामा देवून धनंजय मुंडेनी साडे चार महिने उलटून गेले आहेत. पण अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान सोडले नसल्याचे समोर आले आहे.

४ मार्च रोजी त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील १५ दिवसात शासकीय बंगला सोडणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप त्यांनी बंगला सोडलेला नाही. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडे हे पद मिळाले. त्यानंतर २३ मे रोजी सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेशही निघाला. पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

बंगला न सोडल्यामुळे मुंडे यांना दंड लावण्यात आला आहे आणि त्याची रक्कम आता ४२ लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. दरम्यान, यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ३० मे रोजी मंत्री पदाची शपथ घेतली आणि मला राहण्यास जा म्हटले तेव्हा एखादे घर रिकामे असेल तर आपण जाऊ शकतो, पण तिथे कोणी राहत असेल तर काय करणार. मुंडेंशी कोणतीही चर्चा झाली नाही, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा : 

‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे जागृत झाले राष्ट्रप्रेम

अफगाण नागरिकांनी तालिबान सरकारकडे मागितली मदत

निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशी द्या!

भारतातील सर्वात श्रीमंतांची ६०% संपत्ती रिअल इस्टेट, सोन्यात

दरम्यान, यावर अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली. एक्सवर ट्वीटकरत म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद सोडलं, पण पुन्हा मंत्री म्हणून येण्याची हाव सुटत नाही. ४ मार्चला त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला गेला, आज ४ ऑगस्ट आहे. तब्बल ५ महिने उलटून गेले. ह्या आधी ऑफिसच्या बाहेरची पाटी काढली नाही. ते प्रकरण लावून धरलं म्हणून पाटी काढली, आणि आता हे.

आता शासकिय बंगला तब्बल ५ महिने खाली केला नाही. त्यांचं म्हणणं असे आहे की …आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत रहावं लागत आहे. जरूर रहा, पण माझ्या आणि सामान्य लोकांच्या कराच्या पैशांनी नाही. तो बंगाला हा शासकीय कामासाठी दिला जातो.

जर तुम्ही स्वाभिमानी असतात तर फुकटचं घर घेऊन राहिला नसतात. एक २BHK विकत नाहीतर भाड्यावर घेऊन राहिला असतात. खोटी कारणं दिली नसती. खरंतर हा बंगला ४६६७ चौ फुटाचा बंगला आहे, म्हणजे ह्याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला २०० रुपये चौ फुटाप्रमाणे, तब्बल पाच महिन्याची म्हणून ४६ लाख रुपये इतकी आजरोजी आहे. ह्या दंडाचा पैसांपैसा वसूल केला गेला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हा दंड माफ करण्याचे अधिकार असतात, पण त्यांनी १ रुपया देखील करता कामा नये, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
317,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा