बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजय मिरवणुकीत झालेल्या भगदडप्रकरणी कर्नाटक सरकारने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात थेट आरसीबी मॅनेजमेंटला जबाबदार धरले आहे.
३ जून रोजी आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर मोठा सोहळा आयोजित केला गेला होता. मात्र या कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती, असं सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
विराट कोहलीच्या व्हिडीओसह ‘फ्री एंट्री’ची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर केली गेली, ज्यामुळे सुमारे ३ लाखांहून अधिक गर्दी जमली. पोलिसांनी आधीच परवानगी नाकारलेली असताना कार्यक्रम झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
कार्यक्रमाच्या दिवशी ताशी ३:१४ वाजता आयोजकांनी अचानक प्रवेशासाठी पास लागेल अशी घोषणा केली. यामुळे मोठा गोंधळ, भीती आणि धावपळ सुरू झाली. प्रवेशद्वारे वेळेत उघडण्यात आली नाहीत, संयोजनात घोळ झाला आणि त्यामुळे भगदड झाली, असा ठपका सरकारने ठेवला आहे.
हेही वाचा:
सत्यजित रे यांचे मूळ घर सुरक्षित, तोडफोड झालेली नाही
सत्यजित रे यांचे मूळ घर सुरक्षित, तोडफोड झालेली नाही
गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात उदय सामंत यांची महत्त्वाची घोषणा
इस्रायलमध्ये राजकीय अस्थिरता वाढली
या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ७ पोलीस जखमी झाले. आरसीबी, डीएनए (आयोजक संस्था), आणि केएससीए (कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन) यांच्यात समन्वयाचा अभाव होता, हेही स्पष्ट करण्यात आलं.
सरकारने ही बाब गंभीर मानून न्यायालयात स्टेटस रिपोर्ट सादर केला असून, भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे होणारे प्राणहानीचे प्रसंग टाळण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.







