रुग्णांसाठी औषधे अधिक परवडणारी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) ने प्रमुख औषध कंपन्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या ३५ आवश्यक औषधांच्या किरकोळ किंमतीत कपात केली आहे. कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या या फॉर्म्युलेशनमध्ये हृदयरोग, अँटीबायोटिक्स, मधुमेहविरोधी औषधे आणि मानसिक आरोग्याशी संबंधित औषधांचा समावेश आहे.
रसायन आणि खत मंत्रालयाने एनपीपीएच्या मूल्य नियमनावर आधारित हा आदेश अधिसूचित केला आहे. या किंमत कपातीचा थेट फायदा ग्राहकांना, विशेषतः दीर्घकालीन आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना होणार आहे. ज्या प्रमुख औषधांचा यात समावेश आहे त्यात: Aceclofenac, Paracetamol आणि Trypsin Chymotrypsin Amoxicillin आणि Potassium Clavulanate चा फिक्स्ड डोज़ कॉम्बिनेशन, Atorvastatin कॉम्बिनेशन, Empagliflozin, Sitagliptin आणि Metformin सारखी मधुमेहावरील नविन तोंडावाटे घेणारी औषधे. उदाहरणार्थ, Aceclofenac-Paracetamol-Trypsin Chymotrypsin या गोळीची किंमत आता १३ रुपये करण्यात आली आहे (Acmes Drugs & Pharmaceuticals निर्मित आणि Dr. Reddy’s द्वारे विक्री), तर कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या गोळीची किंमत १५.०१ रुपये आहे.
हेही वाचा..
कुक दिलीपच्या नावाने बनावट अकाउंट
तेजस्वी यादव दोन इपिक नंबरचे रहस्य उघडा
पाकिस्तानची भाषा बोलत आहेत मणिशंकर अय्यर
नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी
त्याचप्रमाणे, हृदयरोगांवर वापरली जाणारी Atorvastatin 40 मिग्रॅ. आणि Clopidogrel 75 मिग्रॅ. असलेल्या एका गोळीची किंमत २५.६१ रुपये निश्चित करण्यात आली आहे. इतर समाविष्ट औषधे: Cefixime आणि Paracetamol यांचे बालकांसाठी ओरल सस्पेन्शन, Colecalciferol Drops (Vitamin D पूरक), Diclofenac Injection – याची किंमत आता ३१.७७ रुपये प्रति एमएल आहे.
किरकोळ विक्रेत्यांनी आणि डीलर्सनी या अपडेटेड किंमती त्यांच्या दुकानात स्पष्टपणे लावणे बंधनकारक आहे. या अधिसूचित किंमतींचे पालन न केल्यास DPCO, २०१३ आणि आवश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये व्याजासह वसूल केलेली जास्त रक्कम परत घेणे समाविष्ट आहे.
एनपीपीएने स्पष्ट केले आहे की या किंमतींमध्ये जीएसटी समाविष्ट नाही, लागू असल्यास ती स्वतंत्रपणे जोडली जाईल. उत्पादकांनी सर्व कायदेशीर आवश्यकता पाळून Form V मध्ये नवीन किंमत यादी IPDMS प्रणालीद्वारे प्रसिद्ध करावी आणि ती एनपीपीए व राज्य औषध नियंत्रण यंत्रणेला कळवावी. या नोटिफिकेशनमुळे याआधीच्या सर्व मूल्य आदेश रद्द करण्यात आले आहेत.







