३१ ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. ३१ ऑक्टोबर १९८७ रोजी, भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्मा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. शर्माने १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध नागपुरात झालेल्या सामन्यात ही कामगिरी केली होती. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतनने केन रदरफोर्ड (२६), यष्टीरक्षक-फलंदाज इयान स्मिथ (0) आणि इवेन चॅटफिल्ड (0) यांना लागोपाठ तीन चेंडूंवर बाद करून या स्पर्धेच्या इतिहासातील पहिली हॅट्ट्रिक पूर्ण केली होती.
३७ वर्षापूर्वी नागपूर येथे विश्वचषक खेळवण्यात आला होता. शर्माने १९८७ च्या क्रिकेट विश्वचषकात नागपूर येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये न्यूझीलंडने ५० षटकात ९ गडी गमावून २११ धावा केल्या. त्याच वेळी किवीज कडून दीपक पटेल यांनी ४० धावा केल्या त्यासह जॉन राइट यांनी ही सर्वाधिक धावा केल्या. चेतनने विश्वचषक खेळीमध्ये दहा षटकांमध्ये ५१ धावा देऊन तीन बळी घेतले होते.
या खेळीदरम्यान चेतन शर्मा यांनी २ षटके निरधाव टाकली होती. त्याशिवाय मनोज प्रभाकर, मोहम्मद अझरुद्दीन, मनिंदर सिंग आणि रवीशास्त्री यांना प्रत्येकी एक विकेट घेतली मिळाली होती. त्यावेळी भारताचे लक्ष केवळ ३२.१ षटकात पूर्ण केले होते. सलामीवीर कृष्णामाचारी श्रीकांत ५८ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. त्यावेळी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार प्राप्त झालेले सुनील गावसकर यांनी ८८ चेंडूत १०३ धावांचे शानदार शतक झळकावले आणि अझरुद्दीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. अझहरने नाबाद ४१ धावा केल्या होत्या.
हे ही वाचा:
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
केंद्राचे राज्याला दोन प्रकल्प, फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार
सीटबेल्ट घातला नसेल तर कारवाईला सामोरे जा…
तेव्हापासून आयसीसी क्रिकेट विश्वचषकात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम १० वेळा झाला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सकलेन मुश्ताक (१९९९), श्रीलंकेचा महान गोलंदाज चामिंडा वास (२००३), ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली (२००३), लसिथ मलिंगा (२००७ आणि २०११), वेस्ट इंडिजचा गोलंदाज यांच्यासह दहा गोलंदाजांनी विश्वचषकात हॅटट्रिक घेतली आहे. केमार रोच (२०११), इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन (२०१५), दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी (२०१५), भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (२०१९) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (२०१९).







