घाणेरड्या टॉयलेटची माहिती द्या, FASTag वर ₹१००० मिळवा

NHAI चा 'क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज'

घाणेरड्या टॉयलेटची माहिती द्या, FASTag वर ₹१००० मिळवा

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने ‘स्पेशल कॅम्पेन ५.०’ अंतर्गत ‘क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज’ उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत, कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझाजवळील टॉयलेट्स जर अस्वच्छ आढळले, तर प्रवासी याची NHAI च्या ‘राजमार्ग यात्रा’ अ‍ॅपवर तक्रार करू शकतात. जर ही तक्रार योग्य व वैध आढळली, तर तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या कारवर असलेल्या फास्टॅगमध्ये ₹१००० जमा केले जातील. हे बक्षीस फक्त फास्टॅग रिचार्ज स्वरूपात मिळेल, ते ट्रान्सफरेबल किंवा रोख स्वरूपात मिळणार नाही.

अभियानाची कालमर्यादा: ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत

हा उपक्रम ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, तो सर्व राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्यांसाठी खुला आहे. मात्र, ही सुविधा फक्त NHAI च्या टोल प्लाझा परिसरातील अधिकृत टॉयलेट्ससाठीच लागू आहे.

तक्रार कशी करायची?

  1. ‘राजमार्ग यात्रा’ अ‍ॅप डाउनलोड करा किंवा अपडेट करा.

  2. अस्वच्छ टॉयलेटची जिओ-टॅग केलेली छायाचित्रे अपलोड करा.

  3. फोटोसोबत खालील माहिती द्यावी लागेल:

    • आपले नाव

    • ठिकाण

    • वाहन क्रमांक

    • मोबाईल नंबर

महत्वाचे मुद्दे :

हे ही वाचा :

२०२७ चा क्रिकेट वर्ल्डकप विराट, रोहित खेळणार?

एआय हब स्थापनेसाठी गुगलकडून अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात!

ग्वाल्हेरमध्ये एअरबेसजवळ १२ वर्षांपासून राहत होते बांग्लादेशी घुसखोर; ८ जणांना अटक!

बिहार निवडणूक: तिकिटासाठी आमदाराचा नितीश कुमारांच्या घराबाहेर ठिय्या, हलण्यास नकार!

 

जिओ-टॅग फोटो म्हणजे काय?

जिओटॅग केलेला फोटो म्हणजे फोटोचे स्थान, तारीख आणि वेळ दाखवणारा फोटो. त्यात स्थानाचे रेखांश, अक्षांश आणि समुद्रसपाटीपासून उंची याबद्दलची माहिती देखील समाविष्ट असते. जिओ टॅगिंग फोटोला GPS डेटाशी जोडते जेणेकरून त्याचे स्थान नकाशावर सहजपणे पाहता येईल.

Exit mobile version