29.2 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरक्राईमनामाकर्नाटकमधील होमस्टेमध्ये अमेरिकन पर्यटकावर बलात्कार

कर्नाटकमधील होमस्टेमध्ये अमेरिकन पर्यटकावर बलात्कार

होमस्टे मालकासह कामगाराला अटक

Google News Follow

कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यात होमस्टेमध्ये एका अमेरिकन पर्यटकावर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब घडल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली. या घटनेप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये मुख्य आरोपी, होमस्टेमधील एक कामगार जो झारखंडचा आहे, आणि त्या होमस्टेचा मालक यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावरील होमस्टेमध्ये महिलेवर तिच्या खोलीत हल्ला केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर मालकाने त्या महिलेला कोणतीही मदत केली नाही. उलट, त्याने कथितरित्या त्या अमेरिकन पर्यटकाला तीन दिवस डांबून ठेवले, तिचा मोबाईल फोन जप्त केला आणि तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी तिला धमकावले.

हे ही वाचा:

ट्रम्प यांचा यू-टर्न; इराणसोबतचा शस्त्रसंधी करार वाढवला

“भारताविरुद्धच्या कृत्यांना प्रत्युत्तर निश्चित!”

“भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतीपुढे झुकणार नाही”

२०२६ ची चारधाम यात्रा सुरू: तारखा, मार्ग, नोंदणी आणि नवीन नियमांची संपूर्ण माहिती

ही घटना सुमारे आठवडाभरापूर्वी घडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती महिला म्हैसूरला गेली, जिथे तिने अमेरिकी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गुन्ह्याची माहिती दिली. अमेरिकी दूतावासाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोडगूचे पोलीस अधीक्षक यांनी या घडामोडीला दुजोरा दिला असून, दोन्ही आरोपींना अटक करून ३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा