वर्ष २०२५ मध्ये भारतीय क्रिकेटला नवे युवा चेहरे मिळाले. या खेळाडूंनी आयपीएल, देशांतर्गत आणि युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
वैभव सूर्यवंशी
अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएल पदार्पण करणाऱ्या वैभवने ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावून इतिहास रचला.
– युवा कसोटी: ४ सामने, २२३ धावा, सरासरी ३१.८५
– युवा वनडे: १२ सामने, ६९० धावा, सरासरी ५७.५०, २ शतके
अभिषेक शर्मा
२५ वर्षीय सलामीवीराने टी२० फॉरमॅटमध्ये मोठी छाप सोडली.
– टी२०: २१ सामने, ८५९ धावा, सरासरी ४२.९५, १ शतक, ५ अर्धशतके
– आशिया कप २०२५: ७ सामने, ३१४ धावा, ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’
कुमार कुशाग्र
झारखंडच्या २१ वर्षीय फलंदाजाने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत चमक दाखवली.
– १० सामने, ४२२ धावा, सरासरी ६०.२९
– अंतिम सामन्यात ८१ धावा, झारखंडला विजेतेपद
सुशांत मिश्रा
२४ वर्षीय वेगवान गोलंदाजाची सातत्यपूर्ण कामगिरी.
– सैयद मुश्ताक अली ट्रॉफी: ११ सामने, २२ विकेट्स, सरासरी १७.१८
– अंतिम सामन्यात ३ विकेट्स
अंशुल कंबोज
२५ वर्षीय वेगवान गोलंदाजाने देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये प्रभाव पाडला.
– सैयद मुश्ताक अली ट्रॉफी: ११ सामने, २१ विकेट्स
– आयपीएल: ८ सामने, ८ विकेट्स







