”काही लोक आले अन वायर कापली, बंगालपेक्षा काश्मीरमध्ये परिस्थिती चांगली”

'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँचवेळी कोलकात्यात गोंधळ, दिग्दर्शकाकडून संताप 

”काही लोक आले अन वायर कापली, बंगालपेक्षा काश्मीरमध्ये परिस्थिती चांगली”

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाचा आज (१६ ऑगस्ट) ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शना दरम्यान गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी आरोप केला की, ट्रेलर लाँचला परवानगी देण्यात आली नाही आणि म्हटले की काश्मीरमध्ये देखील असे घडले नाही, पश्चिम बंगालपेक्षा काश्मीरमधील परिस्थिती चांगली आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाचा ट्रेलर कोलकाता येथे लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना तो चित्रपटगृहात लाँच करायचा होता. पण कोलकाता येथे पोहोचल्यावर त्यांना कळले की हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी एका खाजगी हॉटेलमध्ये त्याचे प्रदर्शन आयोजित केले. येथेही चित्रपटाबाबत गोंधळ उडाला आणि ट्रेलर लाँच करण्यात अडचणी आल्या. मात्र, सर्व अडचणींनंतर आता ‘द बंगाल फाइल्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले, “जर हे हुकूमशाही किंवा फॅसिझम नाही, तर मग काय आहे?… तुमच्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचं पूर्ण अपयश आहे. आणि याचे कारण असे कि सर्व लोक ‘द बंगाल फाइल्स’ला पाठिंबा देत आहेत…”

त्यांनी असा खुलासा केला की, “आत्ताच मला समजलं की काही लोक इथे (खाजगी हॉटेलमधील कार्यक्रमस्थळी) आले आणि सर्व वायर्स कापून टाकल्या. मला माहित नाही की हे कुणाच्या आदेशावरून झालं आहे? पण तुम्हालाही माहित आहे की आमच्या पाठीमागे कोण आहेत. सर्व परवानग्या पूर्ण करूनच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तरीही, हॉटेल व्यवस्थापक आम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नाहीत की आमचा कार्यक्रम का थांबवण्यात आला.”

अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावरही अप्रत्यक्ष टीका केली असून, “द बंगाल फाइल्स” या चित्रपटामागे सत्य उघड करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच अडथळे आणले जात आहेत,” असं त्यांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा : 

“२५०० पानांची चार्जशीट… यूट्यूबर ज्योती मल्होत्रा अडचणीत!”

“अजूनही यौवनात मी… पटौदींचा विक्रम आजही तगडा!”

रशिया-युक्रेन युद्धबंदी नाहीतर होणार शांतता करार?

आशिया कपमधला “चल रे भोपळ्या टुणुक टुणुक”

या घटनेवर बोलताना अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या, “माझा चित्रपट ज्या पद्धतीने थांबवण्यात आला तो मला अजिबात आवडला नाही. या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? चित्रपट निर्माते आणि कलाकार म्हणून, आपण जे बनवले आहे ते प्रदर्शित करू शकत नाही. त्यांना कोणता धोका वाटत आहे? काश्मीरमध्येही असे घडले नाही.

आपण असा निष्कर्ष काढू शकतो का की काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली आहे? आज बंगालमध्ये काय चालले आहे ते पहा. आणि म्हणूनच ‘द बंगाल फाइल्स’सारखे चित्रपट महत्त्वाचे आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीने बंगालबद्दलचे सत्य जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. कलाकारांना आदर देणे ही राज्याची जबाबदारी आहे…” पल्लवी जोशींच्या या वक्तव्यामुळे बंगालमधील सध्याच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

Exit mobile version