ये तो ‘तमाल’ हो गया! रशियन बनावटीची युद्धनौका १ जुलैपासून भारताच्या समुद्रात उतरणार

भारतीय नौदलात समाविष्ट होऊन समुद्री सुरक्षा बळकट होणार

ये तो ‘तमाल’ हो गया!  रशियन बनावटीची युद्धनौका १ जुलैपासून भारताच्या समुद्रात उतरणार

भारताच्या समुद्री सुरक्षा आणि सामरिक क्षमतेला नवसंजीवनी मिळणार आहे, कारण कॅलिनिनग्राडमधून आलेली अत्याधुनिक स्टेल्थ मल्टी-रोल फ्रिगेट ‘तमाल’ १ जुलैपासून भारतीय नौदलात कमीशन होणार आहे. ‘तमाल’ हा रशियाकडून प्राप्त क्रिवाक क्लास फ्रिगेट्स मालिकेतील ८वा आणि तुशील क्लासमधील दुसरा युद्धनौका आहे.

हे जहाज तलवार व तेग या वर्गातील युद्धनौकांचा उन्नत अवतार म्हणून या जहाजाकडे पाहता येते.

‘मेक इन इंडिया’सह आत्मनिर्भर भारत

‘तमाल’ ही परदेशातून येणाऱ्या अंतिम युद्धनौकांपैकी एक असेल. त्यानंतर गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये रशियन तंत्रज्ञान व डिझाईनच्या सहयोगाने दोन फ्रिगेट्सचे बांधकाम भारतात सुरू आहे. हे ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पूरक ठरणार आहे.

‘तमाल’ची तांत्रिक क्षमता

नाव आणि प्रतीक

प्रशिक्षण व चाचण्या

२५० पेक्षा अधिक नौदल जवानांनी सेंट पीटर्सबर्ग व कॅलिनिनग्राड येथे प्रशिक्षण घेतले. ‘तमाल’ने मागील तीन महिन्यांत तीव्र समुद्रपरिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

भारत-रशिया सामरिक भागीदारी

ही युद्धनौका भारत-रशियाच्या दीर्घकालीन संरक्षण सहयोगाचा मूर्त प्रत्यय. कमीशननंतर ‘तमाल’ भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यात समाविष्ट होऊन समुद्री सीमांचे रक्षण अधिक बळकट करेल.

Exit mobile version